शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वाहतूक पोलीस शिंदे यांना श्रध्दांजली

By admin | Updated: September 2, 2016 03:52 IST

कर्तव्य बजावताना दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जुईनगर येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने

नवी मुंबई : कर्तव्य बजावताना दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जुईनगर येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने वाहनधारकांना करण्यात आले. यावेळी ५५0 वाहनधारकांना पोलिसांच्या प्रति आदराची भावना बाळगण्याची शपथ देण्यात आली. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी सदैव तत्पर असतात. स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या समस्त पोलीस कर्मचाऱ्यांचा आदर बाळगायला हवा. परंतु समाजातील काही घटकांकडून पोलिसांना दुय्यम वागणूक दिली जाते. याच मनोवृत्तीमुळे कर्तव्यदक्ष विलास शिंदे या वाहतूक पोलिसाला आपला जीव गमवावा लागला. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने कायदा आणि वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून वाहनधारकांना करण्यात आले. जुईनगर सेक्टर २३ येथील पेट्रोलपंपाजवळ ट्रस्टच्या वतीने दिवंगत विलास शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मोठा फलक लावण्यात आला होता. या फलकावर मी पोलिसांचा आदर बाळगेन, वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन, अशा आशयाचे शपथपत्र लिहिण्यात आले होते. वाहनधारकांना हे शपथपत्र वाचून या फलकावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. त्याला संध्याकाळपर्यंत विविध वयोगटातील ५५0 वाहनधारकांनी प्रतिसाद दिला. यात रिक्षा चालक, दुचाकी चालक व कार चालकांचा समावेश होता. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेळके, नीलेश पवार, आकाश कालंगे, अक्षय म्हस्के, अनिकेत म्हस्के, वैभव पवार, राहुल खेडेकर आदींच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)