शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत आयुक्तांची अनुपस्थिती

By admin | Updated: August 20, 2016 04:53 IST

पाणीप्रश्नावर लक्षवेधी असतानाही आयुक्त सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या

नवी मुंबई : पाणीप्रश्नावर लक्षवेधी असतानाही आयुक्त सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ५० रूपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यास सुरवात केली आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना गरजेपुरते पाणीही उपलब्ध होत नाही. यामुळे नागरिक पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करू लागले आहेत. परंतु अधिकारी आयुक्तांचा आदेश असल्याचे सांगून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांनी नगरसेवकांकडे गाऱ्हाणी मांडण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रशासन नगरसेवकांचेही ऐकत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. नेरूळ पश्चिमेलाही अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवक सूरज पाटील व गिरीश म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली होती. शुक्रवारी लक्षवेधीवर चर्चा होणार होती. परंतु सभागृहात आयुक्त उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना आयुक्तांनीच उपस्थित असले पाहिजे असा आग्रह धरला. आयुक्त येणार नसतील तर सभा तहकूब करा अशी सूचना रवींद्र इथापे यांनी मांडली व कोणतीही चर्चा न करताच सभा गुंडाळण्यात आली. राष्ट्रवादी काँगे्रसने सभा तहकूब केल्याने शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नियमाप्रमाणे आयुक्त ते नसतील तर दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्यांना महासभेत पाठवू शकतात. यापूर्वी अनेकवेळा असे होत असते.परंतु सत्ताधाऱ्यांनी मनमानी करून सभा गुंडाळली आहे. दोन महिन्यातील सर्वसाधारण सभेतील सर्व विषय प्रलंबित आहेत. अनेक महत्वाचे प्रस्ताव असतानाही सत्ताधाऱ्यांनी मनमानी करून कामकाज होवू दिले नसल्याचा आरोप एम. के. मढवी यांनी केला आहे.