शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी घेतली महापौरांची भेट

By admin | Updated: October 16, 2016 03:39 IST

महापौरांनी मुख्यालयावर टाकलेला बहिष्कार व आरपीआयने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी

नवी मुंबई : महापौरांनी मुख्यालयावर टाकलेला बहिष्कार व आरपीआयने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील वादामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रबाळेमध्ये जाऊन महापौरांची भेट घेतली व मंदातार्इंना चहाचे आमंत्रण दिल्यामुळे राजकीय वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गत तीन महिन्यांपासून आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद कमी होऊ लागला होता. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही भेट घेतली नसल्यामुळे व प्रशासनातील अधिकारी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नसल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापालिका मुख्यालयात जाणे बंद केले आहे. लोकशाहीचा गळा घोटला जाणार असेल व लोकांची कामे करता येणार नसतील तर फक्त खुर्चीवर बसण्यासाठी मुख्यालयात जाणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर होण्यासाठी सर्वसाधारण सभा होणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरपीआयने पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे दलित महापौरांचा अवमान होत असल्याचा समज पसरू लागला होता. शहरात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौरांना फोन करून भेटण्यासाठी येत असल्याचे कळविले. रबाळेमधील राजश्री शाहू विद्यालयामध्ये दोघांची भेट झाली. चर्चा काय झाली याविषयी दोघांनीही मौन पाळले असले तरी यामुळे कोंडी फुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार मंदा म्हात्रे व आयुक्तांमध्येही संघर्ष निर्माण झाला होता. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाई. ईटीसी व इतर विषयांवरून मतभेद वाढले होते. यामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त यांच्यामधील संघर्ष राज्यभर गाजला होता. आयुक्तांनी या वादावरही पडदा टाकण्यासाठी मंदाताई म्हात्रे यांना कार्यालयात चहाचे आमंत्रण दिले. लोकहितासाठी आयुक्तांनी पाठविलेले आमंत्रण स्वीकारून आमदारांनी मुख्यालयात जाऊन आयुक्तांशी चर्चा केली. प्रशासन चांगले काम करणार असेल तर आमचा काहीही आक्षेप नसणार आहे. कोणतेही वैयक्तिक काम घेऊन आम्ही पालिकेत येत नाही व पुढेही येणार नाही, असे म्हात्रे यांनी स्पष्ट कले. परंतु ईटीसी केंद्राची चौकशी करण्याच्या विषयावर ठाम असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. याशिवाय शहरातील विकासकामांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.