शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

शेतसारा रोखीतच होतो गोळा!

By admin | Updated: January 11, 2017 06:21 IST

रायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा प्रशासनाला २१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे, १०६ कोटी ९७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यातील करमणूक आणि गौण खनिज यांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कॅशलेस पद्धतीने गोळा केला जातो. मात्र, ग्रामीण भागात शेतसारा गोळा करण्याचा व्यवहार हा अद्यापही रोखीतच होत असल्याने त्याचे प्रमाण हे सुमारे ३२ कोटी रुपयांच्या घरात आहे. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारने सुरू केलेली ‘ग्रास’ योजना ग्रामीण भागात तळागाळात पोहोेचविण्याची गरज आहे.जेएनपीटी बंदराचा विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, अलिबाग-विरार, अलिबाग- वडखळ, मुंबई-गोवा महामार्ग, दिघी पोर्ट, काळ जल विद्युत प्रकल्प यांसह अन्य प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर काहींचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लाखो कोटींची गुंतवणूक झाली आहे. विकासाच्या वाटेवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल आहे. गौण खनिजाच्या माध्यमातूनही महसूल प्रशासनाला प्राप्त होतो, तसाच करमणूक कराच्या रूपानेही बक्कळ कर वसूल केला जातो. हा सर्व कर वसूल करताना चलन भरून अथवा चेकच्या साहाय्याने व्यवहार होतो.शेतीच्या माध्यमातून गोळा करण्यात येणारा शेतसारा अद्यापही रोखीने तलाठी गोळा करीत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मिळणारा कर कमी रकमेचा असल्याने तो रोखीने देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार होतो. ग्रामीण भागामध्ये अद्यापही कॅशलेस व्यवहार करण्याच्या सुविधा नसल्याने कदाचित अडचण होत असावी. शेतसारा हा कमी रकमेचा असतो त्यामुळे छोट्या व्यवहारासाठी स्वाइप मशिनचा काय वापर करायचा, अथवा वापर करायचे ठरवले, तरी तसे स्वाइप मशिन तलाठ्याकडे असणे गरजेचे आहे. एवढ्या कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करण्यासाठी असलेली गव्हर्मेंट रिसीट अकाऊंट सिस्टीम (ग्रास) ही योजना जुलै २०१६ पासून सुरू आहे. या माध्यमातून शेतकरी थेट आॅनलाइन शेतसारा भरू शकतात. मात्र, ‘ग्रास’चा पाहिजे तेवढा वापर होताना दिसत नाही. सध्या यामार्फत सुमारे १५ टक्के व्यवहार केला जातो. २१३ कोटी महसुलाच्या उद्दिष्टाचा विचार केल्यास हे प्रमाण सुमारे ३२ कोटी रुपये एवढेच आहे.गौण खनिज, करमणूक कर आणि शेतसारा या माध्यमातून प्रशासनाकडे जमा झालेला महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीत कॅशलेस व्यवहारानेच भरण्यात येतो. शेतसारा ‘ग्रास’ने भरण्याचे प्रमाण हे सुमारे १५ टक्के आहे. भविष्यात त्यामध्ये वाढ करण्यावर भर देण्यात येईल.-जयराज देशमुख, तहसीलदार, महसूल