शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सफाई ठेकेदारावर प्रशासन मेहरबान

By admin | Updated: September 2, 2015 03:52 IST

महापालिकेच्या रुग्णालयातील ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्याबद्दल लेखापरीक्षण अहवालामध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत. यानंतरही नवीन निविदा न मागविता

नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयातील ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्याबद्दल लेखापरीक्षण अहवालामध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत. यानंतरही नवीन निविदा न मागविता जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा विक्रम पालिका प्रशासनाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, ट्रॉमा केअर युनिट, ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे व नेरूळ माताबाल रुग्णालयाचा ठेका बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीला २००६ मध्ये दिला होता. २०११ पर्यंत सदर ठेक्याची मुदत होती. मुदत संपण्यापूर्वी नवीन निविदा काढणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने निविदा न काढता मूळ ठेकेदारास एक वर्षाऐवजी तीन वर्षांची मुदतवाढ दिली. २०११ - १२ मध्ये साफसफाईसाठी ३ कोटी २२ लाख ८४ हजार रुपये देण्यात आले. यावर लेखा परीक्षण अहवालामध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. नेरूळ माता बालरुग्णालय बंद असताना व ऐरोलीचे महाजन रुग्णालयात छोट्या जागेत सुरू असतानाही ठेकेदाराला पूर्ण रक्कम देण्यात आली आहे. ठेकेदाराला दिलेली वाढीव मुदत जून २०१४ मध्येच संपली होती. त्यापूर्वीही नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली नाही. अद्याप सदर ठेकेदाराला मुदतवाढ देवून त्याच्याकडून काम करून घेतले जात आहे. २८ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये मे ते आॅगस्ट २०१५ पर्यंतच्या मुदतवाढीला मंजुरी दिली असून त्यासाठी १ कोटी ४७ लाख ३३ हजार रुपये खर्च आलेआहे. साफसफाई ठेकेदारास पाच वर्षांच्या मुदतीसाठी ठेका देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात ९ वर्षे त्याला काम करण्याची संधी दिली आहे. तब्बल चार वर्षापेक्षा जास्त काळ मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान यांनी याविषयी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. लेखा परीक्षण अहवालामध्ये आक्षेप घेतल्यानंतरही संबंधित ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ का देण्यात आली. पालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत नसताना पूर्ण बिले कशी देण्यात आली याविषयी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.