शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून वाद!

By admin | Updated: November 7, 2016 03:07 IST

वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ परवाना असलेल्यांनाच मार्केटमध्ये जागा देण्याची भूमिका सद्यस्थितीला महापालिका अधिकारी राबवत आहेत.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ परवाना असलेल्यांनाच मार्केटमध्ये जागा देण्याची भूमिका सद्यस्थितीला महापालिका अधिकारी राबवत आहेत. असाच प्रकार वाशीपाठोपाठ कोपरखैरणेतील फेरीवाला मार्केटमध्ये सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून येत्या काळात वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाशीपाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर ८ मधील फेरीवाला भूखंडावरील मार्केट येत्या दोन दिवसांत खुले होण्याच्या मार्गावर आहे. त्याची प्रक्रिया देखील विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. परंतु १९९८ ते ९९ दरम्यान ज्यांना परवाना वाटप झालेला आहे, अशांनाच त्याठिकाणी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गेली १५ ते २० वर्षे त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना या प्रक्रियेत डावलले जाणार आहे. याचा संताप त्याठिकाणच्या फेरीवाल्यांकडून व्यक्त होत आहे. परिस्थितीअभावी घरखर्च चालवण्यासाठी अनेक जण भाजी, फळे अथवा मासळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मागील काही वर्षांत पालिकेने एकही फेरीवाला परवाना वाटप न केल्यामुळे भविष्यात तो मिळेल या आशेवर अनेक जण फेरीवाला भूखंडावर वर्षानुवर्षे एकाच जागी व्यवसाय करत आहेत. अशाच प्रकारे कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक फेरीवाले जागा अडवून बसले होते. पालिकेने त्याठिकाणी मार्केट उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांचा सर्व्हेही झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये हमखास जागा मिळेल असा विश्वास होता. प्रत्यक्षात मात्र महापालिकेकडून फेरीवाल्यांची निराशा झाली आहे.अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांनाच मार्केटमध्ये व्यवसायासाठी जागा देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. यामुळे मूळ फेरीवाला सुविधेपासून वंचित राहणार आहे. प्रत्यक्षात जे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत त्यांनाच परवाने मिळण्याची गरज आहे. मात्र महापालिकेने १९९८-९९ साली ज्यांना परवान्याचे वाटप केले आहे, त्यांना मार्केटमध्ये जागा देण्याचे धोरण पालिका अधिकारी राबवत आहेत. यावरून येत्या काळात फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. पालिकेने ज्यांना परवान्याचे वाटप दिले, त्यापैकी अनेकांनी कुटुंबामध्येच एकापेक्षा जास्त परवाने लाटल्याची देखील शक्यता आहे. यामुळे प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना परवाना देवून जागा वाटपात प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यापैकी काहींनी वॉक विथ कमिशनर दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेवून फेरीवाला परवान्याची मागणी देखील केलेली. यावेळी मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत योग्य प्रक्रिया राबवण्याचेही त्यांना सूचित केले होते.