शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ओव्हरलोड वाहतुकीला आरटीओचे अभय?

By admin | Updated: May 5, 2017 06:20 IST

अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने

कमलाकर कांबळे / नवी मुंबई अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने नियमबाह्य वाहतुकीला चालना मिळत असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी ही नियमबाह्य पध्दती बंद करावी, यासाठी काही वाहतूकदारांनीच आता बंड पुकारल्याने येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईच्या उरण व पनवेल परिसरातून खडी, क्रॅश सॅण्ड आदी बांधकाम साहित्याने भरलेले हजारो डंपर दरदिवशी मुंबईच्या विविध उपनगरांत जातात. या प्रत्येक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक टन माल भरलेला असतो. अशाप्रकारे ओव्हरलोड मालाची वाहतूक करणे नियमबाह्य आहे. कायदेशीर गुन्हा असतानाही सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. पनवेल येथील येथील गव्हाण कोपरा, जासई आणि कुंडेवाडा येथून खडी आणि क्रश सॅण्डची मुंबई उपनगरात वाहतूक केली जाते. त्यासाठी दिवसाला तब्बल दीड हजार ओव्हरलोडेड डंपर सायन-पनवेल महामार्गे मुंबईच्या विविध उपनगरांत दाखल होतात. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर टप्प्याटप्प्यावर खडी व क्रश सॅण्डने ओव्हरलोड भरलेले डंपर दिसून येतात. वाशी जकात नाक्यावर तर सकाळी ८ ते ११ या वेळेत डंपरच्या लांबच्या लांब रांगा दिसून येतात. ही वस्तुस्थिती असतानाही शहरात अशा प्रकारे अवैध वाहतूक होत नसल्याचा दावा नवी मुंबई आरटीओकडून केला जात आहे. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथके तैनात केल्याचे नवी मुंबईचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी स्पष्ट केले आहे. सायन-पनवेल महामार्गावरून दिवस-रात्र मुंबईच्या दिशेने जाणारे ओव्हरलोडेड डंपर या पथकाच्या नजरेत पडत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकूणच या अवैध प्रकाराला आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.दरम्यान, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारे हे रॅकेट बंद करण्याची मागणी काही वाहतूकदारांनी केली आहे. डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. टायर पंक्चर होवून अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे वाशी खाडी पुलाला धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी डंपर चालकांनी केली आहे.रिपब्लिकन  सेनेचा इशाराअवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने या वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन रा. गायकवाड यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल आरटीओला निवेदन दिले आहे.