शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सिटी टॅक्सी रखडली

By admin | Updated: March 2, 2016 02:25 IST

प्रवासी सुरक्षा आणि भाड्यासह असलेली एकच नियमावली आणि योजना सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजने’द्वारे लागू करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता

मुंबई : प्रवासी सुरक्षा आणि भाड्यासह असलेली एकच नियमावली आणि योजना सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजने’द्वारे लागू करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्यासाठी हरकती व सूचना परिवहनकडून मागविण्यात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे अभिप्रायही सादर करण्यात आला. मात्र शासनाकडून यावर अद्याप निर्णयच घेण्यात आला नसल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नवी दिल्लीत उबर चालकाकडून एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेचे पडसाद देशभरात उमटतानाच महाराष्ट्रातही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला, त्यानंतर ओला, उबरसह अन्य वेब बेस्ड खासगी टॅक्सी कंपन्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात सूचनाही करण्यात आल्या. मात्र यावर बराच वाद झाल्यानंतरही कायमस्वरूपी असा तोडगा काही निघाला नाही. काही खासगी टॅक्सी सेवा अनधिकृतपणे भाडे वसूल करत असल्याचा आरोप काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून करण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. एकूणच सर्व बाबी तपासल्यानंतर टॅक्सी सेवांसाठी एकच नियमावली आणि योजना आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सेवा एक समान पातळीवर आाण्यासाठी सिटी टॅक्सी योजना २0१५ आणण्यात आली. २९ सप्टेंबर २0१५ रोजी अधिसूचना काढतानाच नागरिकांना सूचना, हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत परिवहन विभागाकडे सादर करण्यास सांगितले. या हरकती आणि सूचना एकत्रित गोळा केल्यानंतर परिवहन विभागाने साधारण दोन महिन्यांपूर्वी त्या शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)