शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी स्पर्धेमुळे शहर कर्जबाजारी !

By admin | Updated: January 23, 2016 03:16 IST

स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागाचा फेटाळलेला प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा चर्चेसाठी येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतला तर लोकशाही

नामदेव मोरे,  नवी मुंबईस्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागाचा फेटाळलेला प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा चर्चेसाठी येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतला तर लोकशाही व्यवस्था धोक्यात येणार आहे. महापालिका कर्जबाजारी होणार असून सर्व निर्णय कंपनी कायद्याप्रमाणे स्थापन होणाऱ्या एसपीव्हीला असणार असून नागरिकांवर कर आकारण्यापासून सर्व अधिकार त्यांनाच राहणार आहेत. नवी मुुंबई महानगरपालिकेने ८ डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला होता. राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या बळावर हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यामुळे राष्ट्रवादीवर प्रचंड टीका झाली होती. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला ठराव निलंबीत केला व एक महिन्यात पुन्हा भूमिका मांडण्याच्या सुचना दिल्या होत्या. आता २ फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत यावर चर्चा होणार आहे. एक महिन्याच्या काळात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी या प्रस्तावाचा अभ्यास केला आहे. स्पर्धेतील सहभागामुळे महापालिकेचे नुकसानच होणार असल्याचे समोर येवू लागले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचा कारभार एसपीव्ही प्रणालीकडे जाणार आहे. कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत ही कंपनी स्थापन केली जाणार आहे. ८ हजार कोटी रूपये खर्च करून शहराचा विकास केला जाणार आहे. यामधील केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५०० कोटी रूपये मिळणार आहेत. उर्वरीत ७ हजार कोटी रूपये महापालिकेस उभे करावे लागणार आहेत. कर्ज काढून व कर वाढवून हा निधी उभारला जाणार आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये केंद्र शासनाने सुचविलेल्या योजनांमधील बहुतांश योजना महापालिकेने यापुर्वीच पुर्ण केल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन, भुमिगत विजवाहिन्या, शहरात सीसीटिव्ही कॅमेरे, हवा दर्जा मापन व सुधारणा यंत्रणा, स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, शहराची सांस्कृतीक ओळख, वाहतूक व्यवस्था, पादचारी मार्ग ही कामे यापुर्वीच महापालिकेने पुर्ण केली आहेत. महापालिकेने २० वर्षात केलेली कामेच पुन्हा स्मार्ट सिटीच्या नावाखाली करून मनपाचेच नुकसान होणार आहे. यामुळे शहरातील अनेक जाणकार स्मार्ट सिटी महापालिकेने स्वबळावर करावी. एसपीव्ही च्या नावाखाली स्थापन होणाऱ्या कंपनीकडे कारभार सोपवू नये असे विचार व्यक्त केले जात आहेत. खाजगी कंपनीने काढलेले कर्ज कोण फेडणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.