शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ई-बाइक प्रणालीला नागरिकांची पसंती; २० दिवसांत ९ हजार २०० फेऱ्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 07:02 IST

नियम न मोडण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन 

नवी मुंबई : शहरात वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी, कमी अंतरावर ये-जा करण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या सहकार्याने जनसायकल सहभाग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून ४ जुलै रोजी ई-बाइकचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेला देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. ई-बाइक वापरासाठी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबई हे पर्यावरणशील शहर म्हणून विकास होण्याच्या दृष्टीने वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देणारी जनसायकल प्रणाली महापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. त्यानंतर ४ जुलैपासून शहरात इलेक्ट्रिकल बाइक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक वापरासाठी दहा स्टॅण्ड बनविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात सुमारे ८० ई-बाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ई-बाइक वापरासाठी प्रत्येक दहा मिनिटांना दहा रुपये असा दर असून नागरिक आणि तरुणाई ई-बाइक प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. ई बाइक प्रणालीचे उद्घाटन झाल्यापासून गेल्या २0 दिवसात जवळपास ९ हजार २00 फेºया पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांच्या आणि ई बाइकच्या सुरक्षेच्या दृष्टीने ई बाइक वापरासाठी नियमावली आखून देण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने ई बाइक वापरणाºया व्यक्तीच्या वयाची १६ वर्षे पूर्ण असावीत तसेच डबल सीट बसू नये अशा नियमांचा समावेश आहे. ई बाइक प्रणाली सुरू झाल्यापासून २0 ते २२ नागरिकांनी डबल सीट प्रवास केला असून १६ वर्षांखालील ३ लहान मुलांनी ई बाइकचा वापर केला आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पोलिसात तक्रार देखील करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर यापुढे १0 हजार रु पये दंड वसूल केला जाणार असून ई बाइक वापरताना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका