शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:35 IST

प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध, पोलीस बंदोस्ताचा अभाव आणि बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध, पोलीस बंदोस्ताचा अभाव आणि बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच जाहिर केलेली भूमिका आदीमुळे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला खीळ बसली आहे. याचा फायदा भूमाफियांनी घेतला असून त्यामुळे शहरात नवीन बांधकामांचा धडाका सुरू झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ५६९ अनधिकृत बांधकामांचा सहभाग असलेली दुसरी यादी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व बांधकामे जून २0१५ नंतर पूर्ण झालेली आहेत. या बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची योजना सिडकोने तयार केली आहे. दरम्यान, जून २0१५ अगोदर अर्धवट अवस्थेत असलेल्या परंतु त्यानंतरच्या काळात बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू असलेल्या इमारतींवरसुद्धा कारवाई करण्याचे सुतोवाच सिडकोकडून करण्यात आले होते. त्यानुसार उरण व पनवेल तालुक्यातील काही बांधकामांवर कारवाई करून सिडकोने दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभसुध्दा केला.सिडकोने जाहिर केलेल्या दुसऱ्या टप्यातील यादीत सर्वाधिक म्हणजेच ४१३ बांधकामे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. या बांधकामांवरील कारवाईसंदर्भात महापालिकेची भूमिका सुध्दा गुलदस्त्यात आहे. यातच स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध, पोलीस बंदोबस्ताचा अभाव तसेच राजकीय हस्तक्षेप आदी कारणांमुळे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना सिडकोची अडचण होत आहे. यातच परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात डिसेंबर २0१५ पर्यंतची सरसकट सर्वच बांधकामे नियमित करण्याची घोषणा केल्याने कारवाई संदर्भात सिडकोची संभ्रमावस्था झाली आहे. (प्रतिनिधी)