शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च 

By कमलाकर कांबळे | Updated: November 9, 2023 06:50 IST

घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता.

नवी मुंबई : घणसोली- ऐरोलीदरम्यानचा गेली ११ वर्षे रखडलेला पामबीच मार्ग लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाच्या खर्चावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला असून सिडकोने ५० टक्के खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. सिडको संचालक मंडळाच्या बुधवारच्या बैठकीत या संबंधीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्याचे समजते. घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता.  मात्र, या मार्गाची लांबी दीड किमीने वाढल्याने खर्चही वाढला. सध्याच्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च ४२५ कोटी अपेक्षित आहे. यापैकी सिडकोने अर्धा खर्च उचलावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते; परंतु, सिडकोने आधीच्या अंदाजानुसार फक्त १२५  कोटी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. आता सिडकोने प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे.

मुंबई, कल्याणचे अंतर वाचणारया प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन- खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण तसेच इकोसेन्सेटिव्ह परवाना आदी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पालिकेने निविदासुद्धा काढल्या आहेत. या प्रस्तावित मार्गामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडीला काही प्रमाणात आळा बसेल. हा मार्ग थेट ऐरोली-मुलुंड पुलाला जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रगतिपथावर असलेल्या ऐरोली-कटाई मार्गाने पुढे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड या ठिकाणी सहज जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठीही हा पामबीच मार्ग उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

सिडकोने २००८-२००९ मध्ये घणसोली नोडसह अर्धवट अवस्थेतील पामबीच मार्गही महापालिकेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून हा प्रकल्प ‘जैसे थे’ आहे. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. सुधारित आराखड्यानुसार, या मार्गाची लांबी दीड किमीने वाढली आहे. त्यामुळे तो ३.४७ किमीचा झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको