शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या आडून शहरात अनधिकृत बांधकामांचा धडाका, सिडकोने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 03:00 IST

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेच्या आडून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू केला आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेच्या आडून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू केला आहे. अर्धवट अवस्थेतील बांधकामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. याची गंभीर दखल सिडकोने घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील आठवडाभरात घणसोलीसह तळोजा येथील बेकायदा बांधकामांवर सिडकोने कारवाई केली आहे.सिडकोने अनधिकृत बांधकामांवर अकुंश ठेवण्यासाठी कठोर उपायोजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेने सुध्दा भूमाफियांच्या विरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना काही प्रमाणात आळा बसला आहे .मात्र सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शासकीय यंत्रणा निवडणूकीच्या कामात व्यस्त झाल्या आहेत. याचा फायदा घेत भूमाफियांनी पुन्हा तोंड वर काढायला सुरूवात केले आहे. गाव गावठाणांसह मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत बांधकामे उभारण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. एमआयडीसी क्षेत्रात बेकायदा झोपड्या उभारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.आचारसंहितेच्या पुढील एक दीड महिन्याच्या कालावधीत बांधकामे पूर्ण करून पोबारा करण्याची तयारी भूमाफियांनी चालविली आहे. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणूक कालावधीत सुध्दा नवी मुंबईसह पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, उलवे, तळोजा आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात नवीन बांधकामे उभारली गेली होती. सिडकोची संपूर्ण यंत्रणा निवडणूकीच्या कामात व्यस्त राहिल्याने या बांधकामांना आळा घालणे शक्य झाले नाही. आता विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत सुध्दा हाच प्रकार घडत असल्याने सिडकोने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा धडाका सुरू केला आहे.चार दिवसांपूर्वी घणसोली येथील १0७२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. त्याअगोदर तळोजा येथे पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले. याअंतर्गत सुमारे चार हेक्टरचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.आचारसंहिता असली तरी उपलब्ध पोलीस बळाच्या सहाय्याने अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या संबधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई