शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

कार बाजारसाठी सिडकोचा भूखंड हडप

By admin | Updated: October 5, 2016 03:16 IST

कोपरी येथे जुन्या वाहनांच्या खरेदी - विक्रीची मोठमोठी शोरूम्स आहेत. विशेष म्हणजे या कार बाजारच्या नावाखाली शोरूम्स चालकांनी सिडकोच्या

नवी मुंबई : कोपरी येथे जुन्या वाहनांच्या खरेदी - विक्रीची मोठमोठी शोरूम्स आहेत. विशेष म्हणजे या कार बाजारच्या नावाखाली शोरूम्स चालकांनी सिडकोच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंडांवर अतिक्रमण केले आहे. पामबीच मार्गालगत असलेल्या या अतिक्रमणांकडे सिडको आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.पामबीच मार्गावरील कोपरी येथील या कार बाजारासंदर्भात संबंधित प्रशासनाला यापूर्वी अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पूर्वी या कार बाजारने या परिसरातील पदपथ व्यापले होते. शोरूम्स चालकांनी विक्रीसाठी आलेल्या वाहनांचे थेट पदपथ आणि रस्त्यावर प्रदर्शन मांडले होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने येथील कार बाजारवर धडक कारवाई केली होती. पदपथांवर वाहने उभी करता येवू नयेत, यासाठी या परिसरात टप्प्याटप्प्यावर लोखंडी रॉड लावण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून पदपथ मोकळे झाले होते. असे असले तरी आता या कार बाजारने पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले आहे. स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून शोरूम्स चालकांनी कोट्यवधींच्या भूखंडांवर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी विक्रीसाठी आलेली जुनी वाहने उभी करण्यात आली आहेत. हा व्यवसाय चालविण्यासाठी अनेकांनी या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करून छोटेखानी कार्यालय थाटले आहे. या कार्यालयाच्या परिसरात विविध कंपन्यांची जुनी वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.सिडको व महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर बुलडोझर फिरविला जात आहे. परंतु त्याच वेळी कार बाजारच्या नावाखाली कोपरीत अगदी दर्शनी भागात केलेले अतिक्रमण दिसत नाही का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)