शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

शैक्षणिक संस्थांना सिडकोने दिली तंबी

By admin | Updated: May 7, 2015 00:36 IST

अल्पदरात भूखंड पदरात पाडून घेतल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या नवी मुंबईतील शिक्षण संस्था पुन्हा एकदा सिडकोच्या रडारवर आल्या आहेत.

कमलाकर कांबळे, नवी मुंबईअल्पदरात भूखंड पदरात पाडून घेतल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या नवी मुंबईतील शिक्षण संस्था पुन्हा एकदा सिडकोच्या रडारवर आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आरक्षण ठेवणे, सिडकोबरोबर झालेल्या करारानुसार बंधनकारक आहे. मात्र अनेक संस्थांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने यासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सायबर सिटीत अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थांना सिडकोने अगदी अल्पदरात भूखंड दिले आहेत. हे भूखंड देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत ३ आणि ५ टक्के आरक्षण ठेवण्याची अट घालण्यात आली होती. मात्र अनेक शिक्षणसंस्थांतून या नियमाचे पालन होत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी गेल्या वर्षी संबंधित सर्व संस्थाचालकांची एक बैठक बोलावून करारातील अटी व शर्तींचे संबंधितांना स्मरण करून दिले होते. या बैठकीला ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, सानपाडा, खारघर व नवीन पनवेल या भागांतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे ३१ तर कनिष्ठ महाविद्यालयांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते. संपूर्ण आरक्षण प्रक्रियेचा आढावा घेत आरक्षणाच्या नियमाची तातडीने अंमलबजावणी करून त्याची माहिती सिडकोला कळविण्याचे आवाहन भाटिया यांनी या बैठकीत संबंधित संस्थाचालकांना केले होते. त्यानुसार काही संस्थांनी त्याची अंमलबजावणी केली. तर काहींनी पुढील शैक्षणिक वर्षाचा हवाला देत वेळ मारून नेली होती. मात्र आता चालू शैक्षणिक वर्षात सुद्धा अनेक संस्थांकडून या नियमाच्या अंमलबजावणीबाबत चालढकल होत असल्याचे दिसून आले आहे.नोटिसा बजावणारच्सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षी अनेक संस्थांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांना वर्षभराची सूट दिली होती. च्अशा संस्थांनी या शैक्षणिक वर्षापासून या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यात कुचराई करणाऱ्या संस्थांना नियमानुसार नोटिसा बजावल्या जातील, असे भाटिया यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.