शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वसाहतींना भंगारवाल्यांचा विळखा

By admin | Updated: February 25, 2016 04:17 IST

सिडको वसाहत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भंगारमाफियांनी बस्तान बसवले आहे. सिडको, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आणि इतर शासकीय जागेवर अतिक्रमण

पनवेल : सिडको वसाहत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भंगारमाफियांनी बस्तान बसवले आहे. सिडको, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आणि इतर शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले. बेकायदा व्यवसाय करणारे हे भंगारवाले कोट्यधीश झाले आहेत. त्यांच्यावर सिडकोबरोबर इतर यंत्रणांकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पनवेल परिसराला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही मंडळी परप्रांतीय असून दबाव गट तयार करीत आहेत.कळंबोली स्टील मार्केटमध्ये कुर्ला येथील भंगार बाजार काही वर्षांपूर्वी स्थलांतरित झाला. भंगारवाले बेकायदा व्यवसाय येथे करीत आहेत. त्यांच्यावर स्टील मार्केट कमिटीचे नियंत्रण नाही. बऱ्याच ठिकाणी अनधिकृत गाड्या तोडण्याचे अड्डे आहेत. या ठिकाणी चोरीच्या गाड्या आणल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इंजिनसह इतर पार्ट इतर गाड्यावाल्यांना विकले जातात. त्यातून रग्गड पैसे कमावले जात आहेत. स्टील मार्केटमध्ये या परिसरात सगळ्यात मोठा भंगारचा धंदा आहे. त्या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल बेकायदा होते. हे गोरखधंदे राजरोसपणे सुरू असतानाही त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही. या व्यतिरिक्त चोरीचा माल खरेदी-विक्र ी याच ठिकाणी होते. बेकायदा गोदामात मालाची साठवणूक केली जाते. सिमरन मारुती शोरूमच्या पाठीमागे सिडकोच्या जागेवर भंगारवाल्याने बस्तान मांडले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सिडकोचा जागेचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कमाई या भंगारवाल्याने केली आहे. सुकापूरची परिस्थिती फारशी वेगळी नाही, येथे रस्त्याच्याकडेला भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. द्रुतगती महामार्गाखाली एक भंगाराचा अड्डा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर त्याने दुकान थाटले आहे. तो भंगारवाला चोरीच्या गाड्या खरेदी करून त्यातून लाखो रुपये महिन्याला कमावतो. पनवेल रेल्वेस्थानक रोडवर एकाने आपला भंगाराचा पसारा गेल्या अनेक वर्षांपासून थाटला आहे. आसुडगाव एनएच-४ बीच्या कडेला एका भंगारमाफियाने जागा व्यापली आहे. वडघरला सुध्दा सिडकोच्या जागेवर भंगाराचे मोठे दुकान आहे. याशिवाय खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये लहान मोठ्या भंगारवाल्यांची कमतरता नाही. बहुतांशी ठिकाणी चोरीचे लोखंड, पत्रा, स्टील, चोरीच्या वायरमधील तांबे, पितळ, अ‍ॅल्युमि़निअम त्याचबरोबर गाड्या सुध्दा घेतल्या जातात. त्यामुळे गुन्हेगारांची एक प्रकारे साखळी या व्यवसायात काम करते. बहुतांशी भंगारवाले हे परराज्यातील आहेत. दिवसेंदिवस भंगारवाल्यांची संख्या वाढत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. (वार्ताहर)सिडकोच्या भूखंडावर ज्या ज्या ठिकाणी अतिक्र मण आहेत त्यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. आम्ही संबंधितांच्या विरोधात दोन टप्प्यात मोहीम हाती घेणार आहोत. केवळ भंगारवालेच नाही तर जिथे अतिक्रमण आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- सुभाष गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको