शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वाचवण्यासाठी सीवूडमध्ये ‘चिपको’ आंदोलन

By admin | Updated: November 15, 2016 04:22 IST

सीवूड रेल्वे स्टेशनसमोरील ३७ वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी ‘चिपको’ आंदोलन सुरू केले आहे. एल अ‍ॅण्ड टीला वृक्ष तोडण्यासाठी दिलेली

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनसमोरील ३७ वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी ‘चिपको’ आंदोलन सुरू केले आहे. एल अ‍ॅण्ड टीला वृक्ष तोडण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी व अनधिकृतपणे पदपथ उखडून पालिकेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान, सीवूड रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन, कवी कुसुमाग्रज वाचनालय, सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटना व हरित नवी मुंबई या संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही वृक्षतोड थांबविली नसल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून वृक्षाभोवती कडे केले. १५ वर्षांपासून ही झाडे रहिवाशांना सावली देत आहेत. येथील प्रदूषण कमी करण्याचे काम करत आहेत. आता फक्त एल अ‍ॅण्ड टी इमारतीचा समोरील भाग रोडवरून ये-जा करण्यासाठी सहज दिसावा यासाठी पदपथावरील वृक्ष तोडण्याची परवानगी दिली आहे. पालिकेच्या या निर्णयाचा रहिवाशांनी विरोध केला आहे. पुन्हा वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका वृक्षतोड थांबविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडकोने एल अ‍ॅण्ड टीच्या माध्यमातून सीवूड रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे काम सुरू केले आहे. या कामामुळे नागरिकांना गैरसोयींना होत आहे. इमारतीत व्यावसायिक वापर सुरू करण्यासाठी पालिकेने तात्पुरते भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. यानंतर या इमारतीचा दर्शनी भाग रोडवरून सहज दिसावा यासाठी समोरील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी दिली होती. रेल्वे स्टेशनचे काम करताना ठेकेदारांनी पर्यावरणाचे प्रचंड नुकसान केले आहे. विनापरवाना पदपथ तोडला असून या प्रकरणी संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेना नेते विठ्ठल मोरे, विजय माने, काशिनाथ पवार, सुमित्र कडू, राजेंद्र मोकल, समीर बागवान, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)