शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांच्या रचनेस मुख्यमंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 00:52 IST

महापालिकेच्या सभागृहामध्ये तातडीचा ठराव मांडून करण्यात आलेल्या प्रभाग समित्यांच्या रचनेविषयी शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

नवी मुंबई : महापालिकेच्या सभागृहामध्ये तातडीचा ठराव मांडून करण्यात आलेल्या प्रभाग समित्यांच्या रचनेविषयी शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या ठरावास स्थगिती दिली असून पुन्हा पारदर्शीपणे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला पूर्ण बहुमत मिळाले नाही. अपक्ष नगरसेवक व काँगे्रसच्या मदतीने पालिकेत सत्ता मिळविली आहे. शहरातील सर्व विशेष समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. परंतु दिघा, घणसोली व ऐरोली प्रभाग समित्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे आॅगस्ट महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची फेररचना केल्याचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँगे्रसला फायदेशीर ठरतील अशाप्रकारे प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेवून आंदोलन केले होते. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडेही तक्रार केली होती. म्हात्रे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसची मनमानी सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रभाग समित्यांच्या रचनेस स्थगिती दिली आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून पुन्हा पारदर्शीपणे रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मंदा म्हात्रे यांनी महापालिका मुख्यालयात येवून, आयुक्तांची भेट घेवून त्यांना प्रभाग समिती रचना पुन्हा करण्याची सूचना केली. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर म्हात्रे यांचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि इतर उपस्थित नगरसेवकांनी जल्लोषात स्वागत केले. (प्रतिनिधी)