शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
3
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
4
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
5
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
6
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
7
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
8
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
9
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
10
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
11
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
12
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
13
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
14
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
15
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
16
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
17
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
18
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
19
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
20
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 16:02 IST

CIDCO News: सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 ठाणे  दि. 24: नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.            या बैठकीस नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

            नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या  कामाबाबत यावेळी चर्चा झाली.  संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.  सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

            तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर 20 मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात  गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भुमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

            नवी मुंबईतील 13 रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार श्री. विचारे यांनी मागणी केली.यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्वांच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.