शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दफनभूमीची जागा बदलण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:38 IST

घणसोली ग्रामस्थांचा विरोध; तणावाच्या वातावरणामुळे परिसरात चोख बंदोबस्त

नवी मुंबई : सिडकोने दफनभूमीसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडाला घणसोली ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्याकरिता ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. तर मंगळवारी विभाग कार्यालयावर मोर्चा काढून पालिका आयुक्तांचीही भेट घेतली होती.घणसोलीत दफनभूमीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी घणसोली ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यांना मागणीचे निवेदन देऊन सिडकोने दफनभूमीसाठी दिलेली सध्याची जागा बदलून ती इतरत्र हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिडकोने घणसोली सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक १० हा दफनभूमीसाठी मुस्लीम वेल्फेअर ट्रस्टला ३० वर्षांच्या करारावर दिला आहे. दफनभूमी इतरत्र हलवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याकरिता घणसोली ग्रामस्थांच्या वतीने २०१२ पासून सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु येथील जागा बदलण्यात आली नाही. यामुळे संतप्त घणसोली ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांना धारेवर धरले. त्यानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी चेतन पाटील, तेजस पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेवक घनश्याम मढवी, माजी नगरसेवक दीपक पाटील, नगरसेविका सीमा गायकवाड, मोनिका पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पालिकेच्या वतीने सिडकोला दफनभूमीचा भूखंड बदलण्याचे यापूर्वीच कळवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र, सिडकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दफनभूमीच्या जागेवरून होणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी योग्य तोडगा काढण्याचेही आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले.सिडकोविरोधात असंतोषघणसोली सेक्टर-१८ येथील दफनभूमीसाठी दिलेली जागा गावच्या प्रवेशमार्गावरच असल्याने दफनभूमीसाठी इतरत्र भूखंड देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत घणसोली दर्ग्यालगतची मोकळी जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली होती. मात्र, सिडकोने आर्थिक हित साध्य करण्यासाठी दर्ग्यालगतची जागा विकासकांना विकली व दफनभूमीसाठी फॉरेस्टच्या क्षेत्रात येणाऱ्या जागेत प्लॉट तयार करून तो मुस्लीम वेल्फेअर ट्रस्टला देऊन वाद निर्माण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.