शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या बदलीप्रकरणी अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: March 25, 2017 01:39 IST

पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली केल्याने त्या निषेधार्थ पनवेलमध्ये महापालिका संघर्ष समितीच्या

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली केल्याने त्या निषेधार्थ पनवेलमध्ये महापालिका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सह्यांची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी शिंदे यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त करत येत्या सोमवारी (२७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन हजारे यांनी दिले. सनदी अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करणे लोकशाहीला परवडणारे नाही. राजकीय संबंध जोडून बदली केली गेली, तर तो राजकीय घराण्यांवर अन्याय होईल. त्या घरातून उद्या सनदी अधिकारी तयार होणार नाही, असे हजारे यांनी सांगितले. येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येत असल्याने पनवेलकरांचे म्हणणे त्यांच्याकडे मांडणार असल्याचे आश्वासन अण्णांनी शिष्टमंडळाला दिले.संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली सल्लागार शिवाजीराव थोरवे, खजिनदार रूपा सिन्हा, सचिव यतिन देशमुख, अ‍ॅड. आर. के. पाटील, उज्ज्वल पाटील, पराग बालड, संतोषी मोरे, भावना प्रसाद, किशोर ठोंबरे, हबिबा सय्यद, सन्नाउल्ला सय्यद, सुधीर शेट्टी आदींनी अण्णांची भेट घेतली. (वार्ताहर)