शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाला भासतेय निधीची चणचण

By admin | Updated: May 26, 2017 00:17 IST

स्वच्छ भारत अभियानातील निधीच्या कमतरतेचे वास्तव हे महाभयंकर असल्याचे समोर आले आहे. सुमारे ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांच्या निधीची अद्यापही

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : स्वच्छ भारत अभियानातील निधीच्या कमतरतेचे वास्तव हे महाभयंकर असल्याचे समोर आले आहे. सुमारे ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांच्या निधीची अद्यापही या अभियानासाठी कमतरता भासत आहे. २१ हजार ६१४ लाभार्थ्यांनी २५ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये किमतीची शौचालये बांधली. मात्र, त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने अद्याप एक दमडीदेखील टाकलेली नाही. सरकारच्या या धोरणामुळे शौचालये बांधून पूर्ण झाली असतानाही प्रशासनाला ती रेकॉर्डवर घेता आलेली नाहीत. असे सर्व असतानादेखील हे अभियान यशस्वी होणारच, अशी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सरकारसह प्रशासन मागे राहिलेले नाही.रायगड जिल्ह्यातील तीन लाख ४६ हजार १६६ कुटुंबांपैकी ३१ मार्च २०१६पर्यंत दोन लाख ४२ हजार ७७५ कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. अद्यापही एक लाख चार हजार ३९१ कुटुंबांपैकी ६० हजार ४८६ कुटुंबांनी २०१६-१७पर्यंत शौचालये बांधून पूर्ण केली आहेत. त्यापैकी २१ हजार ६१४ लाभार्थ्यांना २५ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी ३१ मार्च २०१७ पर्यंत २९ हजार ११३ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे; परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये ३४ कोटी ९३ लाख ५६ हजार रुपये टाकण्यात आलेले नाहीत. त्या सर्व लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनकडे रक्कम मिळावी यासाठी तगादा लावला आहे. अद्यापही ४३ हजार ९०५ शौचालयांच्या उभारणीसाठी ५२ कोटी ६८ लाख ६० हजार रुपयांच्या निधीची चणचण भासत आहे.ज्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे ते २९ हजार ११३ लाभार्थी आणि उरलेल्या ४३ हजार ९०५ शौचालयांच्या उभारणीसाठी एकत्रित ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील निधी सरकारला एकट्या रायगड जिल्ह्याच्या ओंजळीमध्ये ओतायचा आहे. मात्र, सरकारने प्रशासनाला एक नवा पैसाही दिलेला नाही.प्रशासकीय पातळीवरून सातत्याने निधीची मागणी करून तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यावाचून प्रशासनाकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी प्रशासन हतबल झाले असल्याचे स्पष्ट होते. निधी उपलब्ध झालेला नसतानाही २९ हजार ११३ लाभार्थ्यांनी पदरचे पैसे खर्च करून शौचालये उभारली आहेत. ती पूर्ण झालेली शौचालये रेकॉर्डवर घेता येत नसल्याने शौचालय बांधण्याचा आकडा हा फुगलेला दिसतो.स्वच्छ भारत अभियान पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सरकारने तातडीने निधी दिला नाही तर रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.