शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चासाठी उद्या ठाण्यातील वाहतुकीत बदल

By admin | Updated: October 15, 2016 06:37 IST

शहरात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी वाहतुकीत बदल केला आहे. या दिवशी सायंकाळपर्यंत ठाणे स्थानकवरील सॅटीस पुलावरून

ठाणे : शहरात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी वाहतुकीत बदल केला आहे. या दिवशी सायंकाळपर्यंत ठाणे स्थानकवरील सॅटीस पुलावरून एकही बस सुटणार नाही. याऐवजी त्या बस ठाणे पूर्व कोपरी स्थानक येथून सुटून आनंदनगर व पुढे तीनहातनाका उड्डाणपुलावरून पुढे जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.तीनहातनाका येथून निघणारा मोर्चा मल्हार सिनेमा-गोखले रोड-मूस चौक-टॉवरनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे शहर वाहतूक शाखेने वरील मार्ग सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. याचदरम्यान, नवी मुंबईकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसना शिवाजी चौक, कळवा क्रीकनाक्याकडे प्रवेश बंद केला आहे. त्या शिवाजी चौकाला वळसा घालून पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने परत जाणार आहेत. तर, बोरिवलीकडून येणाऱ्या बसेसना घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान सिग्नलपासून पुढे कापूरबावडी सर्कलच्या दिशेने तसेच मॉडेल चेकनाका येथून येणाऱ्या बसना रहेजा कॉम्प्लेक्स सिग्नलपासून पुढे तीनहातनाक्याच्या दिशेने प्रवेश बंदी करण्यात येत आहे. वंदना बस स्थानक आणि खोपट मध्यवर्ती बस स्थानक येथील सर्व बसगाड्या खोपट सिग्नल ते कॅडबरी जंक्शनमार्गे पुढे जातील. नाशिक-घोडबंदरकडून येऊन तीनहातनाक्यावरून उजवे वळण घेऊन मॉडेल चेकनाकामार्गे तर मुलुंडकडे जाणारी वाहने तीनहातनाका पुलावरून आनंदनगरकडे जाऊन यू टर्न घेऊन नाक्यावरून डावे वळण घेऊन मुलुंडकडे जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. (प्रतिनिधी)