शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान; तपासाबाबत संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 00:19 IST

महत्त्वाच्या गुन्ह्यातील दोषींची सुटका

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून त्याची उकल केल्यानंतरही न्यायालयात ते सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामध्ये तपासातील बाबींसह साक्षीदार पलटण्याच्या कारणांचा समावेश आहे. याचा परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर होत आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करून आरोपींना न्यायालयाद्वारे कठोर शिक्षा मिळेपर्यंत पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, त्याकरिता गुन्हा घडल्यापासून ते त्याची उकल करेपर्यंतचा तपास महत्त्वाचा असतो. त्यामध्ये घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक तपास यासह साक्षीदार यांचा समावेश असतो. यानंतरही पकडलेल्या आरोपींविरोधात न्यायालयात दोष सिद्ध होऊ न शकल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. गुन्हे प्रकटीकरणात नवी मुंबई पोलिसांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे; परंतु पकडलेले गुन्हेगार अथवा संशयित शिक्षेपर्यंत पोहोचत नसल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. त्यामुळे गुन्हा उघड झाल्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केल्यापासून ते दोष सिद्ध होईपर्यंत पोलिसांची कसोटी पणाला लागत आहे. याबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गतवर्षाच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त करत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार २०१८ च्या तुलनेत अवघी तीन टक्क्यांनी वाढ होऊन गतवर्षात २५.३६ टक्के दोषसिद्ध होऊ शकले आहेत. त्यावरून नवी मुंबई पोलिसांपुढे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान दिसून येत आहे.

पोलिस तपासातील त्रुटी दूर करण्यासह भक्कम साक्षीदार व सबळ पुरावे गोळा करण्यात सुसूत्रता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. गतवर्षात न्यायालयात लागलेल्या निकालांपैकी हत्येच्या २५ गुन्ह्यांचाही समावेश आहे. दोषारोपपत्र सादर केलेल्या २५ पैकी अवघ्या आठ गुन्ह्यांतील आरोपींवरील दोष सिद्ध होऊ शकले. तर हत्येच्या प्रयत्नाच्या १६ पैकी फक्त सहा गुन्ह्यांतील आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचू शकले आहेत. पोक्सो अंतर्गतच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही हेच पाहायला मिळत आहे. पोक्सोच्या ३७६ कलमांतर्गत दाखल ३६ गुन्ह्यांपैकी केवळ १४ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा लागलेली आहे. तर ३५४ व ३६३ कलमांतर्गतच्या ३० पैकी १३ गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊन उर्वरित गुन्ह्यात अटक असलेल्यांची सुटका झाली आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये खोटी तक्रार अथवा साक्षीदार पलटल्याने न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्याचाही परिणाम पोलिसांच्या दोषसिद्धी प्रमाणावर झाला आहे. गतवर्षात बलात्काराच्या १७ गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा खटला न्यायालयात चालला. त्यामधील सात गुन्ह्यांतील फिर्यादींनी न्यायालयात पलटी मारली, तर सात गुन्ह्यांत दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाल्याचे न्यायालयात समोर आले. त्यामुळे गतवर्षात बलात्काराचा एकही गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकलेला नाही.