शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रोहा शहरावर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: October 5, 2016 03:08 IST

मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत.

रोहा : मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते. काही ठिकाणी तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. विविध प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रोहा पोलीस ठाणे, रोहा नगर परिषद, श्री धावीर मंदिर ट्रस्ट व रेल्वे स्टेशन परिसरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या विशेष फंडातून रोहे नगरपरिषद व पोलीस ठाणे परिसराकरिता २० लाख रु. निधीची तरतूद करण्यात आली. नगर पालिका चौक, दमखाडी, तीनबत्ती नाका, मारुती चौक, अष्टमी नाका, पोलीस स्टेशन रोड आदी परिसरात होत असल्याने सर्व प्रकार या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला ब्रेक लावण्यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन हातात हात घालून काम करीत आहे. मध्यंतरी कोकण रेल्वेत प्रवासी झोपले असता त्यांच्याजवळील किमती दागिने, मोबाइल व अन्य वस्तू लंपास करणे, रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे, रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थातून गुंगीचे औषध टाकून लुटणे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनेमुळे रेल्वे पोलीस व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशन परिसरात तिसऱ्या डोळ्याचा बंदोबस्त केला आहे. यातून गुन्हेगारीला चाप बसणार आहे. मागील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. (वार्ताहर)