शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

कपाटबंद फाईलची चौकशी

By admin | Updated: October 6, 2016 03:10 IST

पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत माहेरचा वसा योजनेत बाळंतीणींना दिलेला पौष्टिक आहार निकृष्ट असल्याचे उघड झाले

सदानंद नाईक , उल्हासनगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत माहेरचा वसा योजनेत बाळंतीणींना दिलेला पौष्टिक आहार निकृष्ट असल्याचे उघड झाले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही फाईल कपाट बंद असल्याची बातमी ‘लोकमत’च्या बुधवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये प्रसिध्द होताच प्रशाससनात खळबळ उडाली. बुधवारपासून या फाईलची चौकशी सुरू झाली असून १५ सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी ए आय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या तात्कालीन सभापती समिधा कोरडे यांनी माहेरचा वसा योजने अंतर्गत बाळंतीण व लहान मुलांना पौष्टिक आहारासह किड्स देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. बाळंतीणींना काजू,् बदाम, साखर, रवा, तूप या वस्तूची पिशवी व लहान मुलांसाठी आरोग्य किड्सचे वाटप जुलैच्या पहिल्या आठवडयात महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशिला पवार, तत्कालीन सभापती समिधा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच पौष्टिक आहाराच्या पिशव्या मध्यवर्ती व सरकारी प्रसूतीगृहात दिले होते.शहरातील सरकारी प्रसूतीगृहात ठेवलेल्या पौष्टिक आहाराच्या पिशव्यातील वस्तू निकृष्ट असून किडे असल्याच्या तक्रारी बाळंतीणींनी रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. नसिसिंह इंगळे यांच्याकडे केल्या होत्या. डॉ इंगळे यांनी निकृष्ठ आहार हा बाळंतीण व मुलाच्या आरोग्यास घातक होऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती देऊन साहित्य घेऊन जाण्याचे सांगितले. दरम्यान, ही माहिती मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, बंडू देशमुख, मनोश शेलार, कल्पेश माने, मनुमुद्दीत शेख यांच्यासह कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी रूग्णालयात जाऊन तात्कालिन आयुक्त हिरे यांना जाब विचारून कारवाईची मागणी केली होती.