शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांसमोर खुले

By admin | Updated: May 23, 2017 02:13 IST

महापालिका निवडणुकीमधील प्रत्येक उमेदवाराची आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारीविषयीची माहिती निवडणूक विभागाने सार्वजनिक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका निवडणुकीमधील प्रत्येक उमेदवाराची आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारीविषयीची माहिती निवडणूक विभागाने सार्वजनिक केली आहे. मतदारांना त्यांच्या उमेदवारांविषयी वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडूनही याचे स्वागत करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरताना त्यांच्या सांपत्तिक, शैक्षणिक व गुन्हेगारीविषयी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवार प्रतिज्ञापत्र सादर करतात, परंतु त्याची प्रत फक्त निवडणूक विभागाकडेच उपलब्ध असते. अनेक वेळा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, इंडिया इलेक्शन वॉचसारख्या सामाजिक संस्था उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यालाही मर्यादा येत असतात. सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती नसलेले उमेदवार, सर्वाधिक शिक्षण व सर्वात कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांचीच नावे प्रसारमाध्यमांमधून पुढे येत असतात. सर्वच उमेदवारांची माहिती मतदारांना मिळत नाही. यामुळे पनवेल व भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक विभागाने सर्वच उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, त्याच्या कुटुंबीयांची संपत्ती, त्यांच्यावर असणारे कर्ज, दाखल गुन्ह्यांची माहिती याची यादीच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे प्रयोग करण्यात आला असून नागरिकांनीही त्याचे स्वागत केले आहे. प्रत्येक मतदाराच्या हातामध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र आहे. यामुळे मतदान करताना नक्की कोणाला करायचे, उमेदवारांची आर्थिक स्थिती पाहून मतदान करायचे की त्याचे शिक्षण व प्रत्यक्ष जनसंपर्क पाहून लोकप्रतिनिधी निवडायचा हे ठरविण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. निवडणूक विभागाने मागील काही वर्षांमध्ये कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. पूर्वी उमेदवारांना त्यांचे प्रतिज्ञापत्र हाताने लिहावे लागत होते. एकूणच ही प्रणाली किचकट असल्याने उमेदवारांनाही अडचणींचे होते. प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी नागरिकांनाही त्रासदायक होते. यामुळे निवडणूक विभागाने आॅनलाइन यंत्रणेमध्ये सुधारणा केली आहे. संकेतस्थळावर प्रतिज्ञापत्र पाहणे व समजून घेणे सोपे झाले होते. सर्वच नागरिकांना संकेतस्थळावर जावून प्रतिज्ञापत्र पाहता येत नाही. यामुळे पनवेल व भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहे.