शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाविरोधात मोहीम

By admin | Updated: September 2, 2016 03:56 IST

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने पुन्हा एकदा कंबर असली आहे. जानेवारी २0१६ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने पुन्हा एकदा कंबर असली आहे. जानेवारी २0१६ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात ठाणे व रायगड जिल्ह्यातील एकूण १२७ बांधकामांचा समावेश आहे. जाहीर केलेल्या यादीतील बेकायदा बांधकामांशी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, असे आवाहन सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून करण्यात आले आहे.सिडकोने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात गेल्या वर्षीपासून कारवाई मोहीम छेडली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या प्रखर विरोधामुळे सिडकोला आपली ही मोहीम काहीशी आवरती घ्यावी लागली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ही मोहीम जवळजवळ ठप्प झाली होती. परंतु आता पुन्हा बेकायदा बांधकामांवर सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अर्थात महापालिका कार्यक्षेत्रातील ११४ तर रायगड जिल्ह्यातील १७ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या बांधकामांची रीतसर यादी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली असून नागरिकांनी संबंधित बांधकामांशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे सिडकोने जाहीर केलेल्या यादीत सर्व छोट्या स्वरूपाची बांधकामे आहेत. बड्या बांधकामांकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे. कारण आजही गाव-गावठाणात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. कारवाईच्या धसक्याने मध्यंतरी थांबलेल्या बेकायदा टॉवर्सचे बांधकाम आजही राजरोसपणे सुरू आहे. जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, सानपाडा आदी ठिकाणी फिफ्टी-फिफ्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जुहू गावात एका टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. गेल्या महिन्यात या इमारतीवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. परंतु हे प्रकरण दडपल्याची चर्चा आहे. कोपरखैरणेत महापालिका विभाग कार्यालयाला खेटून दोन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. कारवाईच्या धसक्याने इमारतीचे बाह्यकाम उरकण्यात आले आहे. सध्या अंतर्गत कामे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेचे कार्यालय असलेल्या याच इमारतीत सिडकोचे विभाग कार्यालयसुध्दा आहे. त्यानंतरसुध्दा या इमारतींचे काम राजरोसपणे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. एकूणच या सर्व प्रकारामुळे सिडको आणि महापालिकेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)