शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अर्थसंकल्पात साडेअकरा कोटींची वाढ

By admin | Updated: February 24, 2016 03:13 IST

महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या २0१६-१७ या आगामी अर्थसंकल्पात स्थायी समितीने ११ कोटी ५0 लाख रुपयांची वाढ सुचविली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सदस्यांच्या

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या २0१६-१७ या आगामी अर्थसंकल्पात स्थायी समितीने ११ कोटी ५0 लाख रुपयांची वाढ सुचविली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सदस्यांच्या सूचनांसह स्थायी समितीने वाढीव अर्थसंकल्पास मंजुरी दिली. महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गेल्या आठवड्यात २0१५-१६ चा सुधारित आणि २0१६ -१७ चा १९७५.८५ कोटींचा मूळ वास्तववादी अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला होता. २२ आणि २३ फेब्रुवारी असे दोन दिवस या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा करण्यात आली. जमेच्या बाजूत मालमत्ता करापासून ५८० कोटी अनुदानात पाच कोटी, महावितरणच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्यासाठी दीड कोटी रुपयांचे अनुदान, जाहिरात परवान्यांतून दीड कोटी, नगररचना विकास शुल्कात साडेतीन कोटी अनुदान शुल्क, मालमत्ता करापासून पाच कोटी अशी एकूण साडेअकरा कोटींची वाढ दोन दिवसांच्या चर्चेतून सदस्यांनी सुचविली. त्याचप्रमाणे खर्चाच्या बाजूत शौचालयाची देखभाल दुरुस्ती व कचरा व्यवस्थापनासाठी ७ कोटी, भुयारी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मूळ खर्चात ५० लाखांची वाढ, मोरबे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी साडेपाच कोटी मूळ खर्चात वाढविण्याची शिफारस सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)सदस्यांनी मांडलेल्या सूचना व शिफारशींचा स्वीकारत करीत स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी २0१६-१७ साठी १९८७.३५ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. भारतरत्न अब्दुल कलाम यांचे स्मारक आणि शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. परिवहन समिती आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पालाही स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली.अर्थसंकल्पावरील चर्चेकरिता स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ६ सदस्य अनुपस्थित असून बहुतांश नगरसेवकांनी यावर चर्चा न केल्याचे पहायला मिळाले. उपस्थित १० नगरसेवकांनी अंदाजपत्रकावरील जमा-खर्चावर बोलण्यापेक्षा इतर प्रश्नांवर चर्चा करत सभेतील महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिल्याचे दिसून आले.