शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह

By admin | Updated: May 7, 2017 06:29 IST

शिर व पाय नसलेला अज्ञात महिलेचे धड रबाळे एमआयडीसी येथील नाल्यात आढळून आले आहे. सदर महिलेची

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शिर व पाय नसलेला अज्ञात महिलेचे धड रबाळे एमआयडीसी येथील नाल्यात आढळून आले आहे. सदर महिलेची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी टाकण्यात आला असावा, अशी पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. रबाळे एमआयडीसी येथील जुन्या पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील नाल्यात मृतदेह असल्याची माहिती एका भंगार वेचणाऱ्याने पोलिसांना दिली होती. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. या वेळी तो मृतदेह महिलेचा असून तिचे शिर व पाय कापलेले असल्याचे आढळून आले. मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी तो त्या ठिकाणी टाकलेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार हत्येचा उलगडा करण्याच्या उद्देशाने रबाळे एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष-एकच्या पथकाने घटनास्थळाचा तपास केला. तर नवी मुंबईसह लगतच्या परिसरातून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गतवर्षी तुर्भे एमआयडीसी येथे एका महिलेचा जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर शनिवारी रबाळे एमआयडीसीमध्ये महिलेचे हे धड सापडले आहे. मृताची ओळख पटू नये या उद्देशाने मारेकरूंनी शिर व पाय धडावेगळे करून ते इतरत्र टाकले असल्याचीही शक्यता आहे. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.