शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: May 20, 2017 04:48 IST

पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. आमदार प्रशांत

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर महाआघाडीचे प्रणेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, खारघरमधील गोल्फकोर्स, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदीमुळे पनवेल शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांत चुरस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची व तितकीच प्रतिष्ठेचे ठरली आहे. त्यानुसार भाजपाने प्रचाराचा धडाका लावला आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे स्वत: प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. हायटेक प्रचारावर अधिक भर देण्यात आला आहे. यात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्याचबरोबर दैनंदिन प्रचार रॅली, मंत्री व बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. त्याला महाआघाडीनेही तोडीस तोड उत्तर देत प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे खरी चुरस भाजपा आणि महाआघाडी यांच्यातच पाहायला मिळत आहे. शेकाप हा स्थानिक पक्ष असल्याने पनवेलच्या ग्रामीण भागात या पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत. त्यामुळे शेकापची संपूर्ण भिस्त या ग्रामीण भागातील मतदारांवर आहे. त्याचबरोबर शहरी भागातील पारंपरिक मतदारांकडूनही महाआघाडीला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यानुसार शेकापसह महाआघाडीतील घटक पक्षांनीही आक्रमक प्रचारावर भर दिला आहे. तर भाजपाने ग्रामीण व शहरी भागात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. शहरी भागातील कॉस्मोपॉलिटन मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपासह महाआघाडीनेही आघाडी घेतली आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानुसार भाजपा, महाआघाडीसह शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. शनिवार व रविवार हे शेवटचे दोन दिवस प्रचारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोन दिवसांत अनेक दिग्गजांच्या सभा पनवेलमध्ये होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचार रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेवटच्या दोन दिवसांत कोण कसा प्रचार करतो, त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. महाआघाडीच्या आक्रमक प्रचार प्रणालीचा भाजपाने काहीसा धसका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांत भाजपाला आणखी जोमाने प्रचारात उतरावे लागणार आहे.मोदींचा करिष्मा तारणार? भाजपाने प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीचा प्रभावीपणे वापर केला आहे. देशात व राज्यात अजूनही मोदींचा करिष्मा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विविध निवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतही हा करिष्मा चालेल, असे भाजपाला वाटते. तर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या विविध निवडणुकीत भाजपाला हार पत्करावी लागली. पनवेलमध्येही हा करिष्मा चालणार नाही, असे महाआघाडीचे मत आहे.