शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात भाजपाचे चक्का जाम

By admin | Updated: February 19, 2016 02:30 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून मोठ्या प्रमाणावर नागरी वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यावरून अवजड व ओव्हरलोड वाहतुकीमुळे दिघी ते माणगाव रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली

म्हसळा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून मोठ्या प्रमाणावर नागरी वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यावरून अवजड व ओव्हरलोड वाहतुकीमुळे दिघी ते माणगाव रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, मात्र दिघी पोर्ट प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामुळे भाजपच्या वतीने छेडण्यात आलेले आंदोलन शासनाविरोधात नसून मुजोर दिघी पोर्ट प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी सत्तेत असतानाही दिघी पोर्ट चांगले रस्ते करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी म्हसळा येथे चक्का जाम आंदोलनाच्या वेळी सांगितले. यावेळी आंदोलनकर्ते जिल्हा अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर,भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ३४१ प्रमाणे नोटीस बजावून सुटका केली. या आंदोलनामध्ये श्रीवर्धन क्षेत्र प्रमुख कृष्णा कोबनाक, उपजिल्हा अध्यक्षा सरोज म्हशीलकर, माजी जिल्हा अध्यक्ष संजय कोणकर ,तालुका प्रमुख शैलेश पटेल,श्रीवर्धन तालुका प्रमुख मनोज पटेल, आरपीआय तालुका अध्यक्ष राजेश तांबे, प्रकाश रायकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. प्रशांत ठाकूर म्हणाले की, सत्तेत असताना तुम्ही कसले आंदोलन करीत आहात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याला उत्तर देताना म्हणाले की, सत्तेत असलो तरी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आज चक्का जाम आंदोलन केले जात आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना आमच्या आंदोलनामुळे त्रास सहन करावा लागत असला तरी आजच्या आंदोलनामुळेच दिघी पोर्ट आपल्याला चांगले रस्ते देणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिघी पोर्ट प्रशासनाने रस्ते चांगले केले नाही तर कंपनीच्या गेटसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांनी दिला. (वार्ताहर)