शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दातांवरून कळणार जन्मतारीख?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 01:58 IST

आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत. अनेक अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील मुलांना आपला वाढदिवस कधी असतो, हेच माहीत नसते. त्यामुळे इतरांप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. जन्मतारखेची नोंद कुठेच नसल्याने त्यांच्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. सरकारी कामे अडून राहतात, परंतु जन्माच्या काही वर्षांनंतरही जन्मतारीख शोधता येऊ शकते, असा दावा डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. त्याकरिता दंतचिकित्सेत संशोधनातून त्यांनी विशेष पद्धत अवगत केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने या संशोधनाला मान्यता दिलेली असून महाराष्ट्र सरकारकडेही त्यांनी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या संशोधनाची माहिती दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्याकरिता नेरुळच्या तेरणा डेंटल कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जयरामन यांच्या संशोधनातून जन्मतारीख मिळालेल्या १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र देण्यात आले. तेरणाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या, डॉ. फरिन कटागिया, डॉ. शिशिर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.या संशोधनाकरिता जन्मतारीखच माहीत नसलेल्या तुर्भे एमआयडीसी व इतर झोपडपट्टी परिसरातील मुले शोधण्यात आली होती. त्यांच्या दातांचे एक्स-रे काढून त्यावर केलेल्या संशोधनातून त्यांना जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे कधी न साजरा झालेला जन्मदिवस भविष्यात निश्चित तारखेला साजरा होणार असल्याचा उत्साह या गरीब कुटुंबातील मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. महाराष्ट्र राज्य शासनाने या संशोधनाला मान्यता देऊन त्याद्वारे अनेकांच्या जन्मतारखेचा प्रश्न सोडवण्याची गरज डॉ. जयरामन यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)