शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भोकरे यांची उचलबांगडी

By admin | Updated: March 4, 2016 01:55 IST

शामकांत भोकरे यांची पक्षप्रतोद पदावरून पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली सावंत यांची वर्णी लावली आहे.

अलिबाग : शामकांत भोकरे यांची पक्षप्रतोद पदावरून पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली सावंत यांची वर्णी लावली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने नवीन घडत असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची स्वप्न शामकांत भोकरे यांना गेल्या तीन महिन्यांपासून पडत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अध्यक्षपदासाठी आपलीच निवड करणार अशा अविर्भावात भोकरे होते. परंतु पक्ष नेतृत्वाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून भोकरे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी सुतारवाडीच्या बैठकीत काही प्रमाणात आपली नाराजी प्रकट केली होती. अध्यक्षपद मिळणार नाही याची खात्री पटल्यावर भोकरे यांनी पक्ष नेतृत्वालाच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आव्हान दिले. कोण्या नेत्यामुळे मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालेलो नाही, तटकरेंच्या अशा वागण्याने एकदिवस जिल्ह्यात ते एकटेत पक्षात राहतील, असे वक्तव्य केले होते. भोकरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी विरोधकांच्या सोबत सत्ताधाऱ्यांवरच शरसंधान साधले. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारे विषय सभागृहात काढून त्यांनी विरोधकांच्या दंडात बळ देण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे आणि पक्षाचे सर्वेसर्वा सुनील तटकरे यांची कमालीची नाराजी ओढावून घेतली. सर्वसाधारण सभेनंतर जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार यांचे संकेत प्राप्त झाले होते. दस्तुरखुद्द भोकरे यांनी सांगितले होते की, पक्षप्रतोद पदावर आता मला पाणी सोडावे लागणार. त्याचप्रमाणे भोकरे यांच्याकडील पक्षप्रतोद पद आता काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी महिला सदस्य असलेल्या वैशाली सावंत यांची वर्णी लागली आहे. (प्रतिनिधी)