शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

नैना क्षेत्रात घरे घेताना सावधान...

By admin | Updated: October 14, 2016 06:54 IST

स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बोगस गृहप्रकल्पांचा सुळसुळाट

कमलाकर कांबळे / नवी मुंबई स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बोगस गृहप्रकल्पांचा सुळसुळाट झाला आहे. फसवणुकीच्या विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले काही विकासक पुन्हा या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. बोगस गृहप्रकल्पांच्या नावाने ग्राहकांना लुटण्याचे सत्र सुरूच असल्याने ग्राहकांनी नैना क्षेत्रात घरे घेताना सावधानता बाळगण्याचे आवाहन सिडकोच्यावतीने केले आहे. विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने या परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना तयार केली आहे. पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला पुढील आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन-साडेतीन वर्षांचा विलंब लागल्याने या क्षेत्रातील विकासकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रस्तावित प्रकल्प परवानगीअभावी रखडले आहेत. याचा नेमका फायदा भूमाफियांनी घेतला आहे. मोकळ्या जागा बळकावून विनापरवाना गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्याद्वारे शेकडो गरजूंची फसवणूक केली जात आहे. गेल्या साडेतीन वर्षांत म्हणजेच २0१२ ते सप्टेंबर २0१६ या काळात २३ विकासकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल झालेले बहुतांशी शहरातील नामांकित विकासक आहेत. त्यांच्यावर एकूण ४१ गुन्हे दाखल झाले असून याद्वारे ग्राहकांना तब्बल १00 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले यातील काही विकासक पुन्हा नैना क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.मोकळ्या जागा बळकावून त्यावर गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. अनेकांनी मोकळ्या भूखंडांना कुंपण घालून गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्याचे जोरदार बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. विशेषत: नैना क्षेत्रांतर्गत मोडणाऱ्या सुकापूर, नेरे, उम्रोली, विचुंबे, तळोजा आदी परिसरात हा प्रकार सुरू आहे. या विभागात शेकडो नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर अनेक प्रकल्प प्रस्तावित करून घरांचे बुकिंग सुरू केले आहे. सध्या चार ते पाच हजार रुपयांनी घरांचे बुकिंग घेतले जात आहे. शेजारच्या विकसित क्षेत्राच्या तुलनेत हे दर कमी आहेत.