शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लाभार्थ्यांनाही अन्न सुरक्षेचा लाभ

By admin | Updated: February 29, 2016 02:01 IST

पेण तालुक्यातील हमरापूरमधील रास्त धान्य दुकानातील रेशनकार्डधारक दारिद्र्यरेषेवरील अन्नसुरक्षा योजनेचा बेकायदा लाभ घेत आहेत.

जयंत धुळप,  अलिबागपेण तालुक्यातील हमरापूरमधील रास्त धान्य दुकानातील रेशनकार्डधारक दारिद्र्यरेषेवरील अन्नसुरक्षा योजनेचा बेकायदा लाभ घेत आहेत. याप्रकरणी सुधीर सखाराम जाधव यांनी तक्रार दाखल केल्यावर त्यांची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत चौकशी करून कार्यवाहीचे आदेश रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर धुपारे यांनी पेण तहसीलदारांना दिले आहेत.वादातीत रेशनकार्डधारकांचे कुटुंबनिहाय पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडल अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पेणच्या तहसीलदार वंदना मकू यांनी दिली आहे.पळी-पोयनाड येथे राहणारे सुधीर सखाराम जाधव यांचे हमरापूर हे आजोळ आहे. आपल्या आईच्या हक्कासंदर्भात २९ सप्टेंबर २0१५ रोजी माहितीच्या अधिकारात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत हमरापूर येथील रेशन दुकानातील शिधापत्रिकाधारकांची यादी त्यांनी मागितली होती. ही यादी बनविताना कोणतेही निकष पाळले गेले नाहीत तसेच प्राधान्य गटातील यादीत सरकारी नोकरीत रुजू असलेले बरेचसे लाभधारक आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी, दुचाकी वाहने अशांची नावेही दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट आहेत. या लाभधारकांचे मोठे बंगले आहेत. काहींचे गणपतीचे कारखाने आहेत. अशा बेकायदा लाभधारकांची यादीच सुधीर सखाराम जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रार अर्जासोबत जोडली आहे.