शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे कर्मचारी हवालदिल

By admin | Updated: November 12, 2016 06:44 IST

पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील निर्बंधामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नोटा बंदीमुळे बँकांचे काम वाढले आहे

नवी मुंबई : पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील निर्बंधामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नोटा बंदीमुळे बँकांचे काम वाढले आहे. गुरुवारपासून बँक कर्मचारी कसोटी पणाला लावून काम करतानाचे चित्र दिसून येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळेही बँकाना नोटा बदलण्याकरिता कसरत करावी लागणार असल्याने जेवणाची वेळही कमी करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीदेखील कर्मचाऱ्यांना आॅन ड्युटी राहावे लागणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांचे गणित जुळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. दिवसभर ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा, प्रश्नांचा भडीमार यामुळे बँक कर्मचाऱ्यांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे.सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस काही वेळेस नागरिकांची दिशाभूल करणारे ठरत असल्याने ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे आवाहन बँक कर्मचाऱ्यांना पेलावे लागत असल्याची माहिती अभ्युदय बँकेचे कर्मचारी दक्षता ठाकरे यांनी दिली. बँकेच्या बाहेरील भिंतीवरही ग्राहकांच्या शंका दूर करणारे फलक लावण्यात आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशीही ग्राहकांना सुट्या पैशांसाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागले. (प्रतिनिधी) पनवेल : सरकारचे आदेश धाब्यावर बसवून काही बँकांकडून केवळ खातेदारालाच नोटा बदलून दिल्या जात असल्याने शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या अनेकांची निराशा झाली. आपले पैसे वाया जातील की काय, असा संभ्रम सामान्यांमध्ये निर्माण झाल्याने बँक उघडण्याआधीच लांबचलांब रांगा शुक्र वारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून बँकासमोर लागल्या होत्या. नोटा बदलण्यासाठी बाहेरगावचे प्रवसी व कामाच्या शोधात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, बँकामध्ये खाते नसल्याने त्यांना नोटा बदलून देण्यास काही बँकांकडून आडकाठी करण्यात येत आहे. 1अनेकांना पैसे असूनही सुट्या पैशांअभावी दैनंदिन दूध, भाजी, औषधे खरेदी करता येत नाहीत. नोटा बदलण्यासाठी बाहेरगावचे प्रवासी व कामाच्या शोधात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. सरकारचा आदेश धाब्यावर बसवून केवळ खातेदारांनाच जुन्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. इतरांना मात्र आमच्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरकाम करून किंवा मोलमजुरी करणारे मेटाकुटीस आले आहेत. 2खातेदार नसलेल्याचा फॉर्म भरून घेतल्यावर तो पुन्हा अपलोड करावा लागतो, यात वेळ जातो. त्यातच आमच्याकडे नवीन नोटा अद्याप पुरेशा आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही खातेदारालाच नोटा बदलून देतो अशी माहिती एक बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सोय नाही. सरकारने 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याचा निर्णय बदलला तर माझ्याकडच्या पैशांचे काय करू, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडला आहे.