शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Updated: December 25, 2016 04:38 IST

पनवेल शहरातील महापालिके जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदान ते कामोठे सर्कलपर्यंत बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला

पनवेल : पनवेल शहरातील महापालिके जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदान ते कामोठे सर्कलपर्यंत बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले सहभागी झाली होती. समाजाला जागृत करण्यासाठी व महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत बहुजन क्र ांती मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पनवेल शहरातून कामोठेपर्यंत मोर्चात नागरिकांनी विविध घोषणा दिल्या. सकाळपासून नागरिक मोर्चात हळूहळू सहभागी होत होते. क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नैना प्रकल्प बाधित गावांत व विमानतळ बाधित गावांत जाऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, याला हवा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. या मोर्चास रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक, शेतकरी अशा सुमारे १३० संघटनांनी पाठिंबा दिला होता.रिलायन्स, आरसीएफ, जेएसडब्लू, ओएनजीसी, जेएनपीटी व रायगडमधील इतर खासगी कंपनीतील कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करून घ्यावे, कोपर्डी प्रकरण, तसेच त्यापूर्वीच्या व त्यानंतरच्या तत्सम प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात येऊन त्यासाठी स्वतंत्र न्यायालये व स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना प्रकल्पबाधित लोकांना त्वरित न्याय मिळावा, भटक्या विमुक्त जाती जमातींना अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण मिळावे, ओबीसीमधील अल्पसंख्याक व्यावसायिक जातींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे, बहुजन समाजातील राजकीय नेत्यांवरील राजकीय आकसापोटी केलेली कारवाई थांबवावी, ख्रिश्चन जनसमुदाय, चर्चवरील हल्ले थांबवावेत व त्यांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, आदी विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)