शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिलेच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Updated: February 15, 2016 03:10 IST

आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या महिलेवर बलात्कार करून देहविक्रीसाठी कुंटणखाण्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या महिलेवर बलात्कार करून देहविक्रीसाठी कुंटणखाण्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेच्या सहा वर्षीय मुलीवरही त्यांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने पनवेल परिसरात आलेल्या पत्नीला देहविक्रीसाठी भाग पाडून दोन लहान मुलांनाही डांबून ठेवल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने नवी मुंबई पोलिसांकडे केली होती. त्यानुसार दोन दिवसांत प्रकरणाचा छडा लावून गुन्हे शाखा पोलिसांनी पीडित महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांचीही सुटका केली आहे. तसेच हरून शेख व मंजू मुल्ला या दोघांना अटकदेखील केली आहे. हरून याने त्याच्या परिचयाच्या आसामी महिलेला बेकरीत नोकरी देण्याच्या बहाण्याने पनवेलच्या खिडूकपाडा परिसरात आणले होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही महिला पतीच्या परवानगीने दोन लहान मुलांसह तेथे आली होती. मात्र यावेळी हरून व त्याच्या साथीदाराने या महिलेवर बलात्कार करून धमकावले होते. त्यानंतर नोकरीच्या बहाण्याने मुंबईत नेऊन कुंटणखाण्यात देहविक्रीसाठी ४० हजारांना विकले होते. यावेळी मंजू मुल्ला हिने या महिलेला हरून व त्याच्या साथीदाराकडून विकत घेतले होते. तिथे अत्याचाराला सामोरे जाताना पीडित आसामी महिलेने ग्राहकाच्या मदतीने पतीपर्यंत ही बाब पोचवली होती. तिला कुंटणखाण्यात विकल्यानंतर तिच्या दोन लहान मुलांना हरून याने पनवेलमध्येच स्वत:च्या घरात डांबून ठेवले होते. पत्नी व मुलांच्या शोधात आलेल्या पतीने सदर प्रकाराची तक्रार गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, जगदीश पाटील, विठ्ठल सापते, गोरख पवार यांच्या पथकाने कसून तपास करून अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांनी मंजू मुल्ला हिच्या कुंटणखाण्यातून या महिलेची सुटका केली. तिची ६ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा यांचीही खिडूकपाडामधून सुटका केली. (प्रतिनिधी)