शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: October 12, 2016 05:00 IST

सराईत सोनसाखळी चोराने पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या खिडकीच्या काचाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी त्याला

नवी मुंबई : सराईत सोनसाखळी चोराने पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या खिडकीच्या काचाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी त्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली असून गुरुवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारात त्याच्या गळ्यावर दुखापत झाली असून त्याला जे.जे. रूग्णालयात दाखल केले आहे.आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीचे नाव नजीर अहमद खान (३२) असे आहे. तो खारघरचा राहणारा असून सराईत सोनसाखळी चोर आहे. तीन दिवसापूर्वी त्याला नेरुळ पोलिसांनी नाकाबंदीत पकडून अटक केली होती. त्याने आयुक्तालय क्षेत्रात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये देखिल त्याचे कृत्य कैद झालेले आहे. नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा दहापेक्षा अधिक गुन्ह्यात समावेश असल्याची शक्यता आहे. सोमवारी शौचालयात गेल्यानंतर त्याने त्याठिकाणच्या खिडकीची काच फोडून गळ्यावर जखम करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्याला तत्काळ वाशीतील महापालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु किरकोळ दुखापत असल्यामुळे उपचारानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे त्याला मुंबईच्या जे.जे. रूग्णालयात दाखल केल्याचे वरिष्ठ निरिक्षक अधिकराव पोळ यांनी सांगितले. नजीर खान हा सराईत गुन्हेगार असून चौकशी व चोरीचा मुद्देमाल देण्याचे टाळण्यासाठी त्याने आत्महत्येचा बनाव केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. (प्रतिनिधी)