शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा पाठ्यपुस्तकात हवी

By admin | Updated: May 20, 2015 00:34 IST

अत्याचारातून आजारपण, त्यांची मृत्यूशी झुंज, इच्छामरणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.

नवी मागणी : तज्ज्ञांचाही पाठिंबा, प्रयत्नही सुरूमुंबई : चार दशके अंथरुणाला खिळलेल्या अरुणा शानबाग यांनी अखेर काल जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारातून आजारपण, त्यांची मृत्यूशी झुंज, इच्छामरणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी दिलेली झुंज व केईएमच्या परिचारिकांचे नि:स्वार्थ सेवा व्रत येणाऱ्या पिढीला कळाले तर ते नक्कीच एक आदर्श जीवन घडवायला पोषक ठरेल. याच भावनेतून अरुणा शानबाग यांचा एक धडा पाठ्यपुस्तकात असावा, अशी मागणी होत आहे. इच्छामरणाचा महत्त्वाचा विषय अरुणा यांच्यानिमित्तानेच पुढे आला, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्यही येणाऱ्या पिढीला कळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच अरुणाचा धडा पाठ्यपुस्तकात यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले असून याला तज्ज्ञांनीही पाठिंबा दिला आहे. सर्वांसाठीच आदर्श ठरेलअरुणाची नि:स्वार्थ सेवा करून केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी रुग्णसेवेचा घालून दिलेला आदर्श समाजासमोर यायलाच हवा. केवळ शालेय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजातल्या सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी हा मानवतेचा आदर्श ठरेल. अरुणाचा संघर्ष, परिचारिकांची रुग्णसेवा व्रत आणि एकूणच घटनेचा संपूर्ण अभ्यास करून हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, के.ई.एम. रुग्णालय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेलरक्ताच्या नात्यांचेही मूल्य हरवत चालले आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयातील परिचारिकांनी ज्या भावनेने स्वत:ला सेवेत वाहून घेणे ही खरी माणुसकीची व्याख्या आहे. अरुणाच्या या लढ्याचा आणि केईएमच्या सेवाव्रताचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी तो नक्की प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील संबंधित विभागांनी आणि तज्ज्ञांनी त्वरित याबाबत विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा. ‘लोकमत’चा हा निर्णय स्वागतार्ह आहे. - डॉ. विजया वाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ बोथट समाजापुढे हा आदर्श यायलाच हवाबऱ्याचदा सरकारी रुग्णालयातील सेवेबाबत शंका उपस्थित केली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उपचारांबाबत आजमितीसही सामान्यांच्या मनात शंका निर्माण होतात. अशावेळी गेली ४२ वर्ष केईएम रुग्णालयाने जोपासलेला हा सेवेचा आदर्श बोथट झालेल्या समाजासमोर आला पाहिजे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन अभ्यासक्रमात अरुणाविषयी धडा समाविष्ट करावा.- स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्याठाण्याच्या परिचर्या संस्थेला अरुणाचे नावराज्य सरकारच्या ठाणे येथील परिचर्या प्रशिक्षण संस्थेला दिवंगत अरुणा शानबाग यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ४८ वर्षे जुने असलेल्या या संस्थेत जनरल नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या ८० तर आॅक्झिलरी नर्स मिडवाइफच्या ४० जागा आहेत.