शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

वशिलेबाजीत रखडल्या नियुक्त्या

By admin | Updated: February 29, 2016 02:14 IST

आयुक्तालयातील पाच रिक्त पदांसाठी चार साहाय्यक आयुक्त उपलब्ध होऊनही काहींच्या वशिलेबाजीमुळे सर्वांच्याच नियुक्ती रखडल्या आहेत

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईआयुक्तालयातील पाच रिक्त पदांसाठी चार साहाय्यक आयुक्त उपलब्ध होऊनही काहींच्या वशिलेबाजीमुळे सर्वांच्याच नियुक्ती रखडल्या आहेत. एकापेक्षा जास्त साहाय्यक आयुक्तांनी पनवेलच्याच जागेवर दावा केला असून, त्यांच्यासाठी मंत्रालयातून शिफारशी येत असल्याचेही समजते. त्यामुळे पनवेलच्या हट्टामागचे गूढ काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सद्य:स्थितीला साहाय्यक आयुक्त पदाच्या पाच जागा रिक्त असून, त्यामध्ये वाहतूक शाखेची दोन, मुख्यालय, पनवेल, उरण व पोर्ट या ठिकाणांचा समावेश आहे. या रिक्त जागा भरून काढण्यासाठी इतर ठिकाणच्या चार साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती नवी मुंबई आयुक्तालयात झालेली आहे. त्यापैकी तिघांना बढती मिळाली असून एक बदलीवर आले आहेत. गणेश गायकवाड, श्रीनिवास मुंडे, नितीन कौसडीकर व प्रकाश निलेवाड अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. मात्र रिक्त जागा पाच व उपलब्ध अधिकारी चार असतानाही त्यांच्या पदभाराचा निर्णय आयुक्त स्तरावर रखडला आहे. हजर झालेल्या चौघांपैकी काहींनी पनवेलच्या रिक्त साहाय्यक आयुक्त पदावर दावा केला आहे. यासाठी त्यांची मंत्रालयातून जोरदार वशिलेबाजी सुरू असून त्यांच्यासाठी आयुक्तांकडे शिफारस पत्रेही येत असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे दोन महिन्यांपासून चारही अधिकाऱ्यांच्या नियुक्ती रखडल्या आहेत. वाहतूक शाखेत एका परिमंडळासाठी एक साहाय्यक आयुक्त असल्याने त्यांचे कार्यक्षेत्र परिमंडळ उपायुक्ताएवढे आहे. असे असतानाही सात पोलीस ठाण्यांचा समावेश असलेल्या पनवेलच्या जागेसाठी ते इच्छुक आहेत. पनवेलच्या जागेबाबत त्यांच्यातल्या उत्सुकतेचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. सदर ठिकाणच्या साहाय्यक आयुक्तपदी यापूर्वी शेषराव सूर्यवंशी कार्यरत होते. पोर्टच्या साहाय्यक आयुक्त कार्यक्षेत्रात उरण, न्हावाशेवा व मोरा या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश असून त्याअंतर्गत जेएनपीटी, विमानतळ व सिडकोच्या नैना क्षेत्राचाही समावेश आहे. उद्योग व्यवसायामुळे आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने हे क्षेत्र मोठे असून, येत्या काळात त्याची व्याप्ती अधिक वाढणार आहे. असे असतानाही त्या ठिकाणच्या साहाय्यक आयुक्तपदाला त्यांची नापसंती आहे.