शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांची वाटपपत्रे घेण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन

By admin | Updated: May 18, 2017 03:43 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु या मोहिमेला प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कारण गेल्या तीन दिवसांत जेमतेम ५0 ते ५५ प्रकल्पग्रस्तांनी वाटपपत्रे घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी तातडीने आपल्या भूखंडांची वाटपपत्रे घ्यावीत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील ९ गावांतील जमिनी अधिसूचित करून त्या संपादित करण्यात आल्या आहेत. त्याबदल्यात येथील प्रकल्पग्रस्तांना सोडतीद्वारे पर्यायी जागांचे वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन आणि पुन:स्थापना धोरणांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे वितरित करण्यासाठी १५ ते १९ मे या दरम्यान विशेष कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी या उपक्रमाचा तिसरा दिवस होता. या तीन दिवसांत जेमतेम ५0 ते ५५ प्रकल्पग्रस्तांनीच भूखंडांची वाटपपत्रे घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बुधवारी पनवेल येथील मेट्रो सेंटरला भेट देवून विशेष कॅम्पच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रक्रियेची पाहणी केली. प्रकल्पग्रस्तांची गैरसोय टाळण्यासाठी हे कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पुढाकार घेवून आपल्या भूखंडांची वाटपपत्रे स्वीकारावीत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष कॅम्पची मुदत १९ मे रोजी संपत असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी यात आणखी वाढ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ..अन्यथा वाटपपत्रे न्यायालयात होतील जमाविमानतळबाधितांना जवळपास ४५00 निवाडे तथा भूखंडांची वाटपपत्रे वितरित केली जाणार आहेत. त्यासाठी सध्या पाच दिवसांचा विशेष कॅम्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी या प्रक्रियेची कालमर्यादा वाढविली जाणार आहे. परंतु वेळोवेळी संधी देवूनही प्रतिसाद न देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची वाटपपत्रे न्यायालयात जमा करण्याच्या दृष्टीने सिडको विचार करीत असल्याचे समजते. एकूणच वेळोवेळी दिलेल्या मुदतीत भूखंडांची वाटपपत्रे न घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अंतिम मुदतीनंतर न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत.