शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

राजपूतविरोधात दुसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 03:11 IST

कोट्यवधीच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारका मिल्क व इतर कंपन्यांच्या नावे लक्झरी

नवी मुंबई : कोट्यवधीच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारका मिल्क व इतर कंपन्यांच्या नावे लक्झरी कारसाठी कर्ज घेवून त्याने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ९ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे.विविध बँकांना सुमारे तीनशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कपिल राजपूत याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. राजपूत याच्यासह त्याच्या पाच सहकाऱ्यांना वाशी पोलिसांनी यापूर्वीच आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक केलेली आहे. त्यांच्याकडील पोलीस कोठडी संपताच सोमवारी न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली आहे. अशातच त्याने पंजाब नॅशनल बँकेच्या वाशी शाखेची इतर एका प्रकारात ९ कोटी ५० लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बँकेच्या वतीने यासंबंधीची तक्रार अनुपम प्रसाद यांनी वाशी पोलिसांकडे केली आहे. राजपूत याने सदर बँकेतून त्याच्या विविध कंपन्यांच्या नावे सुमारे २४ कार खरेदीसाठी कर्ज घेतले होते. आॅडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज अशा कोटीच्या घरातल्या या सर्व कार आहेत. यानुसार राजपूत व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गुन्हे शाखा करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्जावर घेतलेल्या कार शोधण्याची मोहीम लवकरच पोलिसांना हाती घ्यावी लागली आहे. त्यामध्ये राजपूत याच्याकडून घेतलेल्या कार वापरणारे अनेक जण पोलिसांच्या चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)