शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

प्रिझम सामाजिक विकास संस्थेस राज्य युवा संस्था पुरस्कार जाहीर

By admin | Updated: March 14, 2017 02:05 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेस देण्यात येणारा २०१४-१५ चा राज्य युवा संस्था पुरस्कार

अलिबाग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेस देण्यात येणारा २०१४-१५ चा राज्य युवा संस्था पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रिझम सामाजिक विकास संस्थेस जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रु पये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे असून, पुरस्कार वितरण सोहळा १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई विद्यापीठ पदवीदान सभागृहात संपन्न होणार आहे. प्रिझम संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलींकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या सहयोगाने मोफत कराटे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, आदिवासी युवक-युवतींना त्यांच्याच गावात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता मध प्रक्रि या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन, आदिवासी महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिरे प्रिझमच्या वतीने नियमित राबविण्यात येतात. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग व प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना विविध कायद्यांची माहिती व्हावी याकरिता अनेक कायदेविषयक शिक्षण शिबिरांचे रायगड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजन करण्यात येते. मतदान जनजागृतीकरिता पथनाट्यातून रायगड जिल्हा प्रशासन व प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात करण्यात आली. युवक-युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे अनेक गावांमध्ये आयोजन, नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्र म एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड-अलिबाग व प्रिझम संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध क्र ीडा स्पर्धांचे आयोजन, बचत गटांच्या महिलांकरिता रोजगाराभिमुख प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्र मांची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आली.