शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने फोडले वीज मंडळ कार्यालय

By admin | Updated: June 1, 2017 05:29 IST

तालुक्यात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता वीज गायब झाली ती मंगळवारी रात्री दहापर्यंत आली नाही. यामुळे नागरिकांचा संयम

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/मुरुड : तालुक्यात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता वीज गायब झाली ती मंगळवारी रात्री दहापर्यंत आली नाही. यामुळे नागरिकांचा संयम सुटून सुमारे पाचशे लोकांच्या जमावाने वीज कार्यालयातील खिडकीच्या काचा, टेलिफोन व संपूर्ण कार्यालयाची तोडफोड केली. वीज मंडळ कार्यालयाच्या अंगणात ठेवलेल्या कारच्या काचा फोडून आपला राग व्यक्त केला. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. या घडलेल्या प्रकारानंतर मुरु ड शहरातील वीज कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त असून पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या देण्यात आल्या आहेत. यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.सध्याच्या परिस्थितीत मुरु ड तालुक्यात वारंवार वीज गायब होत आहे. कधी १६ तास तर कधी ८ तास वीज गायब झाल्याने जनता त्रस्त झाली आहे. वीज गायब झाल्यावर वीज मंडळ कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी पळून जातात, त्यामुळे नागरिकांना वीज कधी येणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अधिकाऱ्यांचे फोन देखील बंद होते, यामुळे नागरिक संतप्त झाले. सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून विजेच्या लपंडावाने ते त्रस्त झाले आहेत. मंगळवारी १८ तासांपेक्षा अधिक काळ होऊनही वीज न आल्याने आणि एमएसईबी कार्यालयात कोणीही अधिकारी न भेटल्याने संतप्त नागरिकांनी तोडफोड के ली. यामुळे मुरुडमध्ये तणावग्रस्त परिस्थिती होती. तणाव निवळण्यासाठी पोलीस उपाधीक्षक दि.बी.निगोठ यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील, रोहा पोलीस निरीक्षक तसेच पोलीस दलाच्या आरसीबी व क्यूआरटी पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत मुरु ड पोलीस ठाण्याचे जमादार रमण महाले व पीएसआय संजय हेमाडे हे किरकोळ जखमी झाले आहे. सोमवारी मध्यरात्री गेलेली वीज ही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजता आली. तोपर्यंत संतप्त जमावाला पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील व पीएसआय हेमाडे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. वीज कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यावेळी तातडीनेमुरु ड तहसील कार्यालयात शांतता कमिटीची सभा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.सभेतील आश्वासने विरली हवेतमुरु डमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, मुरुड तहसीलदार दालनात २५ मे रोजी तहसीलदार दिलीप यादव यांनी वीजमंडळाचे अधिकारी सचिन येरेकर, मानवअधिकारी संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जहीद फकजी व त्यांचे सहकारी यांच्याबरोबर संयुक्त सभा घेतली. जवळपास एक ते दीड महिन्यांपासून संपूर्ण मुरु ड तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठ्याबाबत सतत खेळखंडोबा चालू आहे. यामुळे संपूर्ण तालुक्याची जनता त्रस्त झाली आहे. याबाबत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता.त्यावेळी वीजपुरवठा योग्य होईल असे आश्वासन देण्यात आले होते,मात्र चोवीस तास वीज खंडित राहिल्याने नागरिकांच्या रागाचा उद्रेक झाला.