शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: May 7, 2017 06:11 IST

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो

मधूकर ठाकूर/ लोकमत न्यूज नेटवर्कउरण : स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. जसखार गावातील पात्रताधारक प्रकल्पग्रस्तांना मुलाखतीशिवाय नोकऱ्यांमध्ये तत्काळ सामावून न घेतल्यास, जसखार गावाच्या हद्दीत सुरू असलेली सिंगापूर पोर्टची कामे बंद पाडून १५ मेपासून प्रकल्पाच्या कार्यालयासमोरच लाक्षणिक उपोषणाचा इशारा जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी दिला आहे.जेएनपीटीच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीच्या आणि ५० लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी होणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्ट उभारण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, जसखार गावाच्या हद्दीतून या अत्याधुनिक बंदराचे दोन रस्ते बांधण्याला सुरुवात झाली आहे. या रस्त्यांमुळे जसखार गावातील अनेक घरे संपादन करून पाडावी लागणार आहेत. त्यामुळे सिंगापूर पोर्टने जसखार गावातील प्रकल्पग्रस्त पात्र असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी मागील महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता. आश्वासनांची पूर्तता न करता, उलट पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डावलून चेन्नई येथील अमराठी कामगारांची भरती केल्याचा आरोप करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.