शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

सिडकोकडून पावसाळ्यानंतर जलमार्ग सेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:58 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२० मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२० मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांवर भर दिला जात आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यानंतरबहुप्रतीक्षित जलमार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या सोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन प्रवासी बोट व एक वॉटर टॅक्सी घेण्याची योजना आहे. त्या संदर्भात शिपिंग कॉर्पोरेशनशी चर्चा सुरू आहे. पावसाळ्यानंतर मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.>बेलापूर जेट्टीच्या मार्गात अडथळेबेलापूर खाडीपुलाच्या उलवे बाजूच्या खाडीकिनारी पूर्व व पश्चिम बाजूची तपासणी करण्यात आली. यामध्ये खाडीपुलाच्या पश्चिम बाजूस खाडीच्या पाण्याची खोली जास्त असल्याने या बाजूची जागा जेट्टी उभारणीसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष सिडकोच्या संबंधित विभागाने काढला आहे. त्याचबरोबर तरघर रेल्वे स्थानक परिसरातून विमानतळ क्षेत्राला जोडणाऱ्या खाडीचॅनेलचा पर्यायही पडताळून पाहिला जात आहे. या ठिकाणची प्रस्तावित जेट्टी विमानतळ क्षेत्राजवळ असली तरी येथील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर खारफुटी आहे. त्यामुळे या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास तरी बेलापूर खाडीपुलाजवळील जागा ही जेट्टी उभारण्यासाठी योग्य असल्याचे सिडकोचे मत आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.>महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून नवी मुंबईत वाशी, नेरुळ व बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याच बरोबर बेलापूर येथील खाडीकिनारी सिडको व मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने मरीना प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसर जोडणे शक्य होणार आहे.>नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार प्रत्येकी ४० ते ४५ कोटी रुपये किमतीच्या दोन अत्याधुनिक प्रवासी बोट आणि एक वॉटर टॅक्सी खरेदी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाळा संपताच ही सेवा कार्यान्वित करण्याची योजना आहे.- लोकेश चंद्र,व्यवस्थापकीय संचालक,सिडको