शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

योजनेला प्रशासनाचा अडसर

By admin | Updated: February 17, 2016 02:21 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्युत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाने सरकारचे पाऊल मागे खेचण्याचे काम

आविष्कार देसाई ,  अलिबागजिल्हा परिषदेच्या शाळांना विद्युत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाने सरकारचे पाऊल मागे खेचण्याचे काम केल्याचे दिसून येते. सुमारे १९३ शाळांमध्ये ही अभिनव योजना राबविण्यात येणार होती, परंतु २५ लाख रुपयेच मंजूर असल्याचे कारण देत योजनेला संबंधित विभाग आणि शाळांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काही शाळा अंधारात तर काही शाळांमध्ये अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वास्ताविक पाहता मंजूर झालेल्या निधीतून शक्य तेवढ्या शाळांंमध्ये विद्युत सुविधा योजना राबविता आली असती. ही गंभीर बाब ‘लोकमत’ने रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर त्यांनी तातडीने विद्युतीकरणाच्या कामांची अंमलबजावणी करण्याचे फर्मान सर्व शिक्षा अभियान विभागाला सोडले. सध्या केंद्र पातळीवरून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाच्या बजेटचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, अधिकारी, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी, अभियंता यांची एकच धावपळ सुरू आहे. गेला आठवडाभर पुणे आणि मुंबई येथे सातत्याने बैठका सुरू आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात सुमारे ५० कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ११७ कोटी रुपयांच्या बजेटची मागणी करण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात पदरात किती पडणार आहेत, हे लवकरच कळणार आहे. युडायसनुसार ज्या शाळांमध्ये विजेची सोय नाही, वायरिंग तुटले आहे अथवा खराब झाले आहे अशा ३५८ शाळांचा समावेश २०१२-१३ मध्ये केला होता. त्यानंतर २०१४-१५ साठी १९३ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यासाठी फक्त २५ लाख रुपयांचीच तरतूद असल्याने ते १९३ शाळांसाठी कमी पडत होते, असे सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता राजेंद्र मोकल यांनी सांगितले.च्सर्व शिक्षा अभियान विभाग तसेच प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांकडून प्रस्ताव मागवून जास्त गरजेच्या शाळांची यादी काढून त्या शाळांमध्ये विद्युतीकरण करणे गरजेचे होते; मात्र येथे तसे झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे २०१६ सालचा मार्च महिना आला तरी २५ लाख रुपयांचा निधी खर्च पडलेला नाही.च्शिक्षण विभागाने तातडीने शाळांकडून प्रस्ताव मागवून विद्युतीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा विजेचे वायरिंग खराब आहे. तेथे अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.