शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या प्रशासकीय अधिकारी

By admin | Updated: March 8, 2016 02:09 IST

किमान ५०० मच्छीमार महिलांच्या गराड्यात एक अमराठी भाषिक महिला मराठी-हिंदी संमिश्र भाषेत संवाद साधते आणि त्या महिलाही कु टुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलावे तितक्या आदराने, विश्वासाने बोलताहेत

नवी मुंबई : किमान ५०० मच्छीमार महिलांच्या गराड्यात एक अमराठी भाषिक महिला मराठी-हिंदी संमिश्र भाषेत संवाद साधते आणि त्या महिलाही कु टुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलावे तितक्या आदराने, विश्वासाने बोलताहेत, ही कोणतीही प्रचार सभा नाही, संवाद साधणारी ही महिला कोणी कार्यकर्ती किंवा राजकीय पुढारी नाही, ती आहे एक प्रशासकीय अधिकारी व्ही. राधा सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका. जनतेचे प्रश्न लोकांमध्ये जावून आत्मीयतेने जाणून घेणे आणि त्यांची उकल करण्यासाठी सहानुभूतीपूर्वक तसेच न्याय मार्गाने सार्वमताचा आदर करून निर्णय घेते.१९९४ साली भारतीय प्रशासकीय सेवेत आलेल्या राधा यांनी आजवर औरंगाबाद, पुणे आणि मुंबईत अनुक्रमे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपायुक्त अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. मानव संसाधन विकास आणि कायदा यांचाही गाढा व्यासंग आहे. २०१३ मध्ये त्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका या पदाचा कार्यभार सांभाळला. नवी मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांच्या १२.५ टक्के भूखंडाच्या वाटपात आणलेली सुसूत्रता, विमानतळ प्रकल्पग्रस्तांशी केलेल्या यशस्वी वाटाघाटी, कर्मचारी-अधिकारी यांच्यात सकारात्मक रुजवलेली विचारसरणी, विभागांच्या कार्यपद्धती लोकसुलभ करण्यासाठी प्रशासकीय करण्यासाठी प्रशासनिक प्रक्रियेत केलेली पुनर्रचना अशी बहुआयामी कामगिरी लीलया पार पाडत प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र कर्मचारी, अधिकारी यांच्या मनात एक आदराचं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. सिडकोचा कारभार हाती घेताच पहिला कार्यक्रम त्यांनी हाती घेतला तो गावभेटीचा. ही गावं होती विमानतळ प्रकल्पात येणारी. नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यात संपूर्ण विस्थापित होणाऱ्या कुटुंबांची संख्या हाताच्या बोटावर मोजावी एवढीच होती. जमीन अधिग्रहित करण्यापेक्षा भूमिपुत्रांनी ती स्वेच्छेने हस्तांतरित करावी, ही भावना मनात ठेवून व्ही. राधा यांनी या कामाला प्रारंभ केला.प्रकल्पग्रस्तांचा विश्वास संपादन करणं सहजसाध्य काम नव्हतं. इथली संस्कृती निराळी, भाषा वेगळी तरीही राधा मॅडमने हे शिवधनुष्य उचलण्याचं आव्हान स्वीकारलं. कारण त्या जाणून होत्या की, आत्मीयतेला भाषा नसते. आपल्या मनातील प्रामाणिक व स्वच्छ विचार हे याहृदयीचे त्या हृदयीचा प्रत्यय देतात. प्रकल्पग्रस्तांना मान्य असणारं तसेच प्रचलित भूसंपादन कायद्यातील तरतुदींच्या तुलनेत सर्वोत्तम पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेज शासनाकडून मंजूर करून घेण्यात व्ही. राधा यांना यश आलं.